उस्मानाबाद, 1 ऑक्टोबर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आता राज्यसरकारने मंदिरांची दारे पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. नवरात्रौत्सवात (Navratri) मंदिरे पुन्हा सुरू (Temples reopen) होणार आहेत. मात्र, असे असले तरी नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. नवरात्रौत्सवात मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून (Tuljabhavani Mandir Sansthan) नियमावली जाहीर (Guidelines for Navratri) करण्यात आली आहे. पाहूयात काय म्हटलं आहे या नियमावलीत. 7 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत आहे. यासाठी उस्मानाबाद जिल्हाधिकारी आणि तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यानुसार, दररोज पहाटे 4 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत या काळात 15 हजार भाविकांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. अशी आहे नियमावली दररोज 15 हजार भाविकांना दर्शनासाठी प्रवेश परराज्यातील ज्या भाविकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांनाच जिल्ह्यात प्रवेश लसीकरण न झालेल्या भाविकांना 72 तासांपूर्वीचा आरटीपीसीआर अहवाल दाखवणे बंधनकारक गर्दी न करता कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन बंधनकारक चेहऱ्यावर मास्क असणे बंधनकारक सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक नवरात्रौत्सवात कोजागिरी पौर्णिमा रद्द 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात बंदी, तुळजापूर शहरात भाविकांना प्रवेश नाही तुळजाभवानी मंदिरात 65 वर्षांवरील नागरिकांना तसेच गरोदर स्त्रिया आणि 10 वर्षांखालील मुलांना प्रवेश नाही भाविकांना केवळ मंदिरात प्रवेश, अभिषेक आणि इतर विधींना परवानगी नाही नवरात्रीपासून राज्यातील सर्व मंदिरं उघडणार नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्यात येणार आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. ‘धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये’ असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. ‘दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल’ असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.