मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /वर्दीतला नराधम, पोलीस उपनिरीक्षकाने केला महिला काॅन्स्टेबलवर बलात्कार!

वर्दीतला नराधम, पोलीस उपनिरीक्षकाने केला महिला काॅन्स्टेबलवर बलात्कार!

हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर शेलार यांने या घटनेचं मोबाईलमध्ये चित्रिकरणही केलं. त्यानंतर हे हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर शेलार यांने या घटनेचं मोबाईलमध्ये चित्रिकरणही केलं. त्यानंतर हे हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर शेलार यांने या घटनेचं मोबाईलमध्ये चित्रिकरणही केलं. त्यानंतर हे हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

    प्रशांत बाग, प्रतिनिधी

    नवी मुंबई, 17 नोव्हेंबर : मिटू मोहिमेत अनेक सेलेब्रिटी आणि राजकारणी वादात सापडले. आता तर ज्यांनी कायद्याचं रक्षण केलं पाहिजे त्याच खाकीतील माणसाने सैतानी कृत्य केले आहे. एका महिला पोलीस काॅन्स्टेबलने पोलीस उपनिरीक्षकावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहे.

    ही घटना  वाशी पोलीस स्टेशनमध्ये असताना घडली.  पीडित महिला पोलीस काॅन्स्टेबल आहे. तर आरोपी अमित शेलार हा तेव्हा नाईकपदावर काम करत होता. मागील वर्षी २०१७ मध्ये आरोपी अमित शेलारने पीडित महिलेला ज्यूसमधून गुंगीचे औषध दिले. अर्धवट शुद्धीवर असताना अत्याचार केला. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर शेलार यांने या घटनेचं मोबाईलमध्ये चित्रिकरणही केलं. त्यानंतर हे हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

    व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन २०१७ ते १३ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत सीबीडी, पनवेल तसेच कामोठे या ठिकाणी वाहनात नेऊन अत्याचार केला. पीडित महिलेनं याला विरोध केला असता शिवीगाळ करून मारहाण केली.

    या प्रकरणी नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक अमित शेलार यांच्यावर एका महिला काॅनस्टेबलने हे आरोप केले आहे. या प्रकरणी भा.द.वि.कलम ३७६ (२) (क) (ज) (न),३२८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी अमित शेलारला अटक कऱण्यात आली नाही.

    First published:

    Tags: #MeToo, Cbd, Navi mumbai, Navi mumbai police, Police, नवी मुंबई, पोलीस, लैंगिक अत्याचार