जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कपडे स्वच्छ करण्याच्या नादात प्रायव्हेट पार्टमध्ये भरली हवा; धुळ्यातील तरुणाचा भयानक मृत्यू!

कपडे स्वच्छ करण्याच्या नादात प्रायव्हेट पार्टमध्ये भरली हवा; धुळ्यातील तरुणाचा भयानक मृत्यू!

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच सहकाऱ्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये धातूचे कण साफ करण्यासाठी वापरण्यात येणारा प्रेशर पंप घातला आहे.

  • -MIN READ Dhule,Dhule,Maharashtra
  • Last Updated :

धुळे, 13 डिसेंबर : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच सहकाऱ्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये धातूचे कण साफ करण्यासाठी वापरण्यात येणारा प्रेशर पंप घातला. या घटनेत अंतर्गत दुखापत झाल्यानं पीडित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. साक्री तालुक्याच्या निजामपूरमधील ही घटना आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. निजामपूरमधील घटना  पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवार दुपारी साक्री तालुक्यातील निजामपूरमध्ये घडली आहे. आरोपी आणि मृत्यू झालेला कर्मचारी हे दोघेही निजामपूरमधील एका खासगी कंपनीमध्ये काम करत होते. ही कंपनी धातू कामाशी संबंधित सेवा पुरवते. या कंपनीतील कर्मचारी हे आपल्या कपड्यावर जमा झालेले धातुचे कण साफ करण्यासाठी हाय प्रेशर पंपचा वापर करतात. हेही वाचा :  ते एक वाक्य जिव्हारी लागलं अन् महिलेनं उचललं टोकाचं पाऊल, पतीच्या कॉलने घेतला पत्नीचा जीव मस्करी भोवली  रविवारी रोजच्याप्रमाणे कामावरून सुटी झाल्यानंतर कपड्यावर जमा झालेले धातूचे कण हटवण्याचं काम सुरू होत. याचदरम्यान मस्करी करण्याच्या नादात आरोपीने आपल्याच कंपनीत काम करणाऱ्या एका सहकाऱ्याला पकडले. त्याने त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये धातुचे कण साफ करणारा प्रेशन पंप घातला. हा पंप उच्च वायूदाबाचा असल्यामुळे हवेच्या दाबामुळे संबंधित तरुणाच्या अंतर्गत भागात इजा झाली. त्यातच या तरुणाचा मृत्यू झाला. हेही वाचा :  पत्नीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, औरंगाबादमधील धक्कादायक घटना आरोपीला अटक पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार संबंधित पीडित तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्रेशर पंप घालण्यात आल्यानं या घटनेत तो गंभीर जखमी झाला होता. या तरुणाला सुरुवातील नंदुरबार रुग्णालयात दाखल करण्यात आलं, त्यानंतर त्याला गुजरातमधील सूरतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र गंभीर दुखापत झाल्यानं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात