मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /महाराष्ट्रातील मास्क सक्ती हटवली जाणार? मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्रातील मास्क सक्ती हटवली जाणार? मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

महाराष्ट्रात कोविड प्रतिबंधात्मक लसिकरण मोठ्या वेगाने सुरू आहे. येत्या काळात मास्कची सक्तीही हटवली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली यावर मंत्री आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra mask free soon?)

महाराष्ट्रात कोविड प्रतिबंधात्मक लसिकरण मोठ्या वेगाने सुरू आहे. येत्या काळात मास्कची सक्तीही हटवली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली यावर मंत्री आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra mask free soon?)

महाराष्ट्रात कोविड प्रतिबंधात्मक लसिकरण मोठ्या वेगाने सुरू आहे. येत्या काळात मास्कची सक्तीही हटवली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली यावर मंत्री आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. (Maharashtra mask free soon?)

नाशिक, 29 जानेवारी : राज्यातील कोरोनाची तिसरी लाट आता ओसरत असल्याचं दिसून येत आहे. त्यासोबतच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण (vaccination) सुद्धा मोठ्या वेगाने सुरू आहे. त्याच दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या (Maharashtra Cabinet Meeting) नुकत्याच झालेल्या बैठकीत राज्य मास्कमुक्त (Mask Free Maharashtra) करण्याच्या संदर्भात चर्चा झाली. त्यामुळे राज्य लवकरच मास्कमुक्त होणार असल्याचं बोललं जाऊ लागलं. यावर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aaditya Thackeray) यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं, गैरसमज आपण काढला पाहिजे की, मास्कची सक्ती काढली जाईल. आतापर्यंत आपण सर्व निर्णय हे डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेतले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा पॅन्डेमिक संपलेलं आहे असं कुठेही सांगितलेलं नाहीये. ओमायक्रॉन किंवा कुठलाही व्हेरिएंट हा वीक किंवा स्ट्राँग आहे, व्हेरिएंट हा व्हेरिएंट असतो. आपल्याला स्वत:ला वाचवायचं असेल तर आतापर्यंतचं सर्वात चांगलं शस्त्र हे मास्क आहे.

वाचा : पुतण्याची काकावर कुरघोडी? राज ठाकरेंनी उभारलेल्या शस्त्र संग्रहालय परिसरात बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान

नाशिक दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना मास्क संबंधित प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे तुर्तास तरी राज्यातील मास्कची सक्ती हटवली जाणार नाहीये हे स्पष्ट आहे. त्यामुळे नागरिकांनो मास्क घालण्यासाठी कंटाळा करु नका किंवा टाळू नका. मास्कचा वापर करा, कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचं पालन करा आणि सुरक्षित रहा.

मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा

27 जानेवारी रोजी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मास्क संदर्भात चर्चा झाली. युरोप, इंग्लंड आणि फ्रान्ससह अनेक देशांनी मास्क न वापरण्यासंदर्भात भूमिका घेतलेली असताना आपणही भूमिका घेणार का? अशी चर्चा मंत्रिमंडळात झाली. राज्यात मास्क वापरणे आता गरजेचे नसणार अशी चर्चा यावेळी झाली. मास्क संदर्भात लवकरच टास्क फोर्सशी चर्चा करणार आहे. टास्क फोर्सच्या निर्णयानंतर मास्क बाबतीत धोरण होणार आहे.

महाराष्ट्रातील कोविड 19 संसर्गाची परीस्थिती आणि संभाव्य असलेल्या चौथी आणि पाचव्या लाटेची शक्यता आहे. या सर्वांचा सखोल अभ्यास करूनच राज्य सरकार निर्णय घेणार असल्याचं बोललं जात होतं. पण आता मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर राज्यातील मास्कची सक्ती हटवली जाणार की नाही? हे येत्या काळातच स्पष्ट होईल.

First published:

Tags: Aaditya thackeray, Coronavirus, Face Mask, महाराष्ट्र