मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Nashik Wholesale Market : नाशिकमधील सर्वात स्वस्त मार्केट, फक्त 40 रुपयांमध्ये मिळतात मुलांचे कपडे, Video 

Nashik Wholesale Market : नाशिकमधील सर्वात स्वस्त मार्केट, फक्त 40 रुपयांमध्ये मिळतात मुलांचे कपडे, Video 

X
Nashik

Nashik Wholesale Market : या बाजारपेठेमध्ये लहान मुलांचे विविध व्हरायटीचे कपडे उपलब्ध आहेत.

Nashik Wholesale Market : या बाजारपेठेमध्ये लहान मुलांचे विविध व्हरायटीचे कपडे उपलब्ध आहेत.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Nashik, India

  विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी

  नाशिक, 15 मार्च : नाशिक शहरातील शालिमार बाजारपेठ ही कपड्यांसाठी प्रसिद्ध बाजारपेठ आहे. या ठिकाणी अनेक नागरिक हे कपडे खरेदी करण्यासाठी येत असतात. या बाजारपेठेमध्ये आता लहान मुलांचे विविध व्हरायटीचे कपडे उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या विविध कपड्याचे पॅटर्न या ठिकाणी आकर्षक आहेत.

  कोणते कपडे उपलब्ध? 

  या बाजारपेठेमध्ये एक दिवसापासून तर अठरा वर्षांपर्यंतचे मुलांचे कपडे आहेत. लहान मुलांमध्ये झबल टोपड, होजिअरी ड्रेस, टूईन वन, 5 पिस ब्लेजर, 3 पिस ब्लेजर, जीन्स, टी शर्ट, तसेच मुलींमध्ये शरारा, वन पिस फ्रॉक, शॉर्ट फ्रॉक असे विविध प्रकारचे कपडे या ठिकाणी उपलब्ध आहेत, अशी माहिती कल्पराज दुकानातील विक्रेते विनोद भावसार यांनी दिली आहे.

  Mumbai Market : गुढीपाडव्याला हवाय इतरांपेक्षा वेगळा ड्रेस? 'इथं' संपेल तुमचा शोध,Video

  काय किंमत?

  40 रुपयांपासून तर 2800 रुपयांपर्यंत कपडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. ग्राहकांची आवड ही वेगवेगळी असते. प्रत्येक ग्राहकाचे काही तरी वेगळेपण असते. त्यामुळे त्यांच्या डिमांडनुसार आम्ही त्यांना कपडे उपलब्ध करून देत असतो. त्यात लहान मुलांचे विविध प्रकार आहेत. साध्या जीन्स, टी शर्ट घेण्याकडे ही अनेक ग्राहकांचा कल असतो, असंही विक्रेते विनोद भावसार यांनी सांगितलं.

  कुठे आहे ही बाजारपेठ?

  नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ही शालिमार बाजारपेठ आहे. साधारणता सकाळी 9 ते रात्री 11 वाजे पर्यंत ही बाजारपेठ चालू असते. त्या वेळेत आपण या ठिकाणी कपडे खरेदी करू शकतो.

  गूगल मॅपवरून साभार

  First published:

  Tags: Lifestyle, Local18, Nashik, Shopping