जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'नेत्यांना जमलं नाही, पण मनोरुग्णाने करून दाखवलं'; 17 वर्षांपासून वादात अडकलेल्या मालेगावातील स्मारकाच्या उद्घाटनाचा Video

'नेत्यांना जमलं नाही, पण मनोरुग्णाने करून दाखवलं'; 17 वर्षांपासून वादात अडकलेल्या मालेगावातील स्मारकाच्या उद्घाटनाचा Video

'नेत्यांना जमलं नाही, पण मनोरुग्णाने करून दाखवलं'; 17 वर्षांपासून वादात अडकलेल्या मालेगावातील स्मारकाच्या उद्घाटनाचा Video

नाशिकच्या मालेगाव शहरातील किडवाई रोड चौकात ही घटना घडली. मनोरूग्णाने केलेल्या या उद्घाटनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

नाशिक 07 ऑगस्ट : स्वतंत्र लढ्यात शहीद झालेल्या शहिदांचा सन्मान म्हणून 2005 साली एटीटी हायस्कूलजवळ किडवाई मार्गावर शहीद स्मारक तयार करण्यात आले होते. मात्र, त्यावरुन अनेक गैरसमज निर्माण झाले आणि हा विषय न्यायलायात गेला. त्याचा अद्यापही निकाल लागला नाही त्यामुळे कायदा आणि स्थानिक राजकारणात हे स्मारक अडकलं होतं. 17 वर्ष पूर्ण होऊनदेखील या स्मारकाचं उद्घाटन झालं नव्हतं. आता अखेर एका मनोरुग्णाने याचं उद्धाटन केलं आहे. क्रिकेटच्या मैदानात झाला आयुष्याचा खेळ; गुप्तांगाला बॉल लागल्याने पंढरपुरातील तरुणाचा मृत्यू नाशिकच्या मालेगाव शहरातील किडवाई रोड चौकात ही घटना घडली. मनोरूग्णाने केलेल्या या उद्घाटनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या 17 वर्षांपासून स्मारक उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होतं. मात्र, अखेर शनिवारी एका मनोरुग्णाने या स्मरकावर चढून त्याचं उद्घाटन केलं. इतकंच नाही तर त्याने या ठिकाणी साफसफाई करून पुष्पहारदेखील अर्पण केला.

जाहिरात

राजकीय वादात सापडलेल्या या शहीद स्मारकाचं मनोरुग्णाने केलेलं उदघाटन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. संबंधित मनोरुग्णाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संवेदनशील भागात झालेल्या प्रकारची प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे. शहरातील वातावरण बघडवण्याच्या उद्देशाने कोणी जाणीवूर्वक हे करून घेतलं नाही ना? याबाबतची चर्चा सध्या रंगलेली पाहायला मिळत आहे. OPINION | सबसिडींवर होणारी लूट थांबवा अन्.. तर खर्‍या अर्थाने ‘हर घर तिरंगा’ सार्थकी लागेल मनोरुग्णाने हे काम करून हुतात्म्यांच्या बलिदानाचा तर सन्मान केलाच पण सोबतच नेत्यांच्या तोंडावर चपराकही मारली आहे, अशी चर्चाही सध्या शहरभर रंगली आहे. राजकीय नेत्यांना जी गोष्ट 17 वर्षांमध्ये समजली नाही, ती या मनोरुग्णाला समजली, असं म्हटलं जात आहे. मात्र, पोलिसांनी आता या मनोरुग्णाला ताब्यात घेतलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात