मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Nashik : मोफत प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी होण्याची तरुणांना संधी, पाहा काय आहे पात्रता

Nashik : मोफत प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी होण्याची तरुणांना संधी, पाहा काय आहे पात्रता

Free training center : मोबाईल रीपेअरिंग, इलेक्ट्रिशियन आणि फिटर फेब्रिकेशन कोर्सचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Free training center : मोबाईल रीपेअरिंग, इलेक्ट्रिशियन आणि फिटर फेब्रिकेशन कोर्सचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Free training center : मोबाईल रीपेअरिंग, इलेक्ट्रिशियन आणि फिटर फेब्रिकेशन कोर्सचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik [Nasik], India

    नाशिक, 31 जानेवारी : सद्याच्या घडीला अनेक तरुण-तरुणी बेरोजगार आहेत. शिक्षण घेऊन देखील अनेकांना नोकऱ्या मिळत नाही आहेत. त्यामुळे उच्चशिक्षित होऊनही नैराश्याच्या गर्तेत तरुणांना जावं लागत आहे. त्यामुळे नाशिक मधील श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान संचालित विवेकानंद इन्स्टिट्यूटने अल्पसंख्यांक आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये मोबाईल रीपेअरिंग, इलेक्ट्रिशियन आणि फिटर फेब्रिकेशन कोर्सचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्सचे प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे, असं आवाहन विवेकानंद इन्स्टिट्युट कडून करण्यात आले आहे.

    या कोर्सची वैशिष्ट्ये काय आहेत ?

    1) पूर्णतः मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

    2) कोर्स पूर्ण झाल्यानंतर शासनमान्य प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

    3) स्वयंरोजगार निर्मिती संदर्भात मार्गदर्शन केलं जाणार आहे.

    4) प्रशिक्षणानंतर नोकरीची संधी

    विद्यार्थ्यांची मर्यादा किती आहे ?

    या प्रशिक्षणामध्ये एक बॅच असणार आहे. त्यात 30 विद्यार्थी असतील. एक बॅच पूर्ण झाल्यास तात्काळ दुसरी बॅच सुरू केली जाणार आहे. एका बॅचमध्ये एकूण 30 विद्यार्थी प्रशिक्षण घेणार आहेत. प्रशिक्षणाचा कालावधी हा 3 महिन्यांचा आहे आणि दररोज 2 तास प्रशिक्षण दिले जाणार आहे.

    या कोर्ससाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

    1) आधारकार्ड झेरॉक्सची 1 प्रत

    2) पासपोर्ट साईज 2 फोटो

    3) आठवी पास शाळेच्या दाखल्याची 1 झेरॉक्स प्रत

    4) वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे इतकी आहे.

    कुठे शिकवला जाणार कोर्स?

    नाशिक शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी मेहेर सिग्नलजवळ इंडियन बँकेजवळ अनंत गौरव चेंबर तिसऱ्या मजल्यावर विवेकानंद इन्स्टिट्युट आहे. चौकशीसाठी 7588188061/7588188062 या मोबाईल क्रमांकावर विद्यार्थी संपर्क साधू शकतात.

    Best career Fields: 12वीनंतर काय करू? Confuse आहात? या क्षेत्रांमध्ये शिक्षण घेतलं तर Life Set

     विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासाची व्यवस्था

    नाशिक जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना आपल्या गावावरून शहरात येण्यास बराच वेळ लागतो. कधी कधी जाण्याची-येण्याची व्यवस्था होत नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची गैर सोय होऊ नये याकरिता विवेकानंद इन्स्टिट्युटने या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची देखील व्यवस्था केली आहे, असं विवेकानंद इन्स्टिट्युटचे चीफ ऑफिसर संदीप कूयटे यांनी सांगितले.

    First published:

    Tags: Career, Local18, Nashik