मुंबई, 31 जानेवारी: भारतात नोकऱ्यांची काही कमी नाही. मात्र काही क्षेत्रांमध्ये उच्चशिक्षित आणि अंगात योग्य ते गुण असलेल्या तरुणांची गरज असते. जर तुमच्यात हे गुण असतील तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला पगारही (high salary jobs) उत्तम मिळतो. भारतात (jobs in India) काही क्षेत्रांमध्ये नोकरी करताना तुम्हाला लाखो रुपये पगार मिळतो. हे क्षेत्र नक्की कोणते आहेत याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग (CSE)
कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगला भारतात सर्वात मोठी मागणी आहे. अॅमेझॉन (Amazon), मायक्रोसॉफ्ट (Microsoft), गूगल (Google) आणि फेसबुक (Facebook) सारख्या टेक कंपन्या मोठ्या संख्येनं पदभरती करतात. एका अनुभव नसलेल्या इंजिनिअरला साधारणतः वर्षाचा पाच ते सात लाख रुपये पगार मिळतो.
कमर्शियल पायलट (Commercial Pilot)
कमर्शियल पायलटच्या नोकरीत पैसे तर आहेतच पण यांच्याकडे आदरानं बघितलं जातं. दर महिन्याकाठी यांना दीड ते दोन लाख रुपये पगार मिळतो.
डॉक्टर (Doctor)
डॉक्टर आणि इंजिनिअर हे देशातील दोन पारंपारिक व्यवसाय आहेत. देशात डॉक्टरांची मोठी कमतरता आहे. म्हणून त्यांच्यासाठी बर्याच संधी आहेत. जरी डॉक्टर आपली प्रॅक्टिस करत असेल तरी ते दर महिन्याला लाखो रुपये कमवतात.
तुमच्या जॉब अप्लिकेशनसोबत Cover Letter नसेल तर नोकरी मिळत नाही? एक्सपर्ट्सनी दिलं परफेक्ट उत्तर
चार्टर्ड अकाउंटंट (CA)
चार्टर्ड अकाउंटंटच्या व्यवसायाला कधीच मरण नाही. प्रत्येक कंपनीला सीए (CA) आवश्यक असतो. जे लोक पहिल्याच प्रयत्नात सीए फायनल करतात त्यांना वर्षाला 11-15 लाख रुपये पगार मिळतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Education, Job