मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मोठी बातमी! त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहातील शिव पिडींवरील बर्फाचा Video खोटा, पुजाऱ्यांनीच आखला डाव

मोठी बातमी! त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहातील शिव पिडींवरील बर्फाचा Video खोटा, पुजाऱ्यांनीच आखला डाव

काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहातील पिंडीवर बर्फ तयार झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता. मात्र हा व्हिडीओ खोटा असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणात तीन पुजाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

नाशिक, 9 फेब्रुवारी : मागच्या वर्षी जून महिन्यात नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान हा बनाव असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी देवस्थान समितीच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. 30 जून 2022 रोजी पहाटे त्रंबकेश्वरच्या पिंडीवर बर्फ आढळल्याचे समोर आले होते. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

दरम्यान त्र्यंबकेश्वरचे हवामान आणि गर्भगृहातील तापमान पहाता बर्फ कसा तयार झाला यावर अनेकांनी शंका उपस्थित केली होती. त्यावर सत्यशोधन समिती गठित करून सीसीटीव्ही फूटेजची पाहणी करण्यात आली. त्यात तुंगार ट्रस्टच्या तिघांनीच पिंडीवर हा बर्फ ठेवल्याचे उघड झाले आहे. अमरनाथ प्रमाणेच त्र्यंबकेश्वरलाही बर्फ तयार झाला असा खोटा प्रचार केल्याचा ठपका सुशांत तुंगार, आकाश तुंगार आणि उल्हास तुंगार यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

" isDesktop="true" id="827850" >

त्रंबकेश्वर देवस्थानच्या 3 पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहातील शिव पिंडीत बर्फ तयार झाल्याचा व्हिडिओ 30 जून 2022 रोजी व्हायरल करण्यात आला होता.

काय आहे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीचा इतिहास? पाहा Video

मात्र हा व्हायरल व्हिडियो खोटा असल्याचा अनिसने दावा केला होता. चौकशी नंतर पुजाऱ्यांनीच बर्फ आणून टाकल्याचे उघड झाले आहे. भाविकांच्या भावनेशी खेळ करणाऱ्या पुजाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

First published:

Tags: Fraud, Nashik, Tra