जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भाजपला तरी काय नावं ठेवणार? ED च्या कारवाईवरून भुजबळांचा गुगली

भाजपला तरी काय नावं ठेवणार? ED च्या कारवाईवरून भुजबळांचा गुगली

भाजपला तरी काय नावं ठेवणार? ED च्या कारवाईवरून भुजबळांचा गुगली

छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांना संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर इडीने (ED) केलेल्या कारवाईबाबत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी दिलेल्या उत्तराने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नाशिक, 4 ऑगस्ट : छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांना संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर इडीने (ED) केलेल्या कारवाईबाबत प्रश्न विचारण्यात आला असता, इडीच्या कायद्यात लवकर जामीन मिळत नाही, पण काही मार्ग निघाला तर आमच्या शुभेच्छाच आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये छगन भुजबळ यांना विरोधक इडीच्या कायद्याचा गैरवापर होतोय, असा आरोप करत आहेत, यावर प्रश्न विचारला असता त्यांनी वेगळाच गुगली टाकला. अनेक विरोधी पक्षांनी हा कायदा राक्षसी असल्याचं म्हणलं आहे, हा कायदा युपीएच्या काँग्रेसच्या काळातच बनवला गेला आहे. चिदंबरम साहेबांनीच हा कायदा बनवला आहे, त्यामुळे भाजपला तरी काय नावं ठेवणार? असं सूचक विधान भुजबळांनी केलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार 5 तारखेला होईल का? याबाबत माहिती नाही. अनेक याचिकांची गुंतागूंत सुप्रीम कोर्टात चालू आहे, ती कशी सुटते ते बघू, असं भुजबळ म्हणाले. तसंच मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे, त्यावरही भुजबळांनी भाष्य केलं. रात्री 2 पर्यंत जागतात, प्रवास करतात. आपल्याला पण देह आहे, त्याची परिसिमा आहे. थोडा पॉझ घ्यावाच लागतो. दोनच मंत्री आहेत, असं वक्तव्य भुजबळांनी केलं. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ आणि इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. या भेटीत आम्ही मागणी केली की पूरग्रस्तांना, शेतकऱ्याना मदत करा.. 92 नगरपालिका, 4 नगरपंचायत मध्ये ओबीसी आरक्षण लागू नाही.. बांठीया कमिशनन मध्ये ओबीसीची संख्या कमी दाखवली जातीय, अनेक त्रुटी आहेत त्यासाठी तुम्ही लक्ष घालावे, असं भुजबळ म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात