नाशिक, 30 मार्च : 'राम त्यांच्याबरोबर राहू शकत नाही. ज्यांनी हिंदुत्व सोडला आहे. त्यांच्यासोबत राम राहू शकत नाही. खरंतर हिंदुत्वाचे प्रतीक राम आहे. आपण हिंदुत्वापासून लांब गेलो हे त्यांनी स्वतः पंतप्रधान महोदय यांच्यासमोर कबूल केलेलं आहे आणि महाराष्ट्रात पुनर्प्रस्थापित युती करू असं आश्वासन देऊन दिल्लीवरून पुन्हा मुंबईत आले त्यांनी आश्वासन पाळला नाही, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे.
रामनवमीनिमित्त शालेक शिक्षण मंत्री दीपक केसरकर नाशिकच्या काळाराम मंदिरात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलत असताना केसरकरांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
राम त्यांच्याबरोबर राहू शकत नाही. ज्यांनी हिंदुत्व सोडला आहे. त्यांच्यासोबत राम राहू शकत नाही. खरंतर हिंदुत्वाचे प्रतीक राम आहे. आपण हिंदुत्वापासून लांब गेलो हे त्यांनी स्वतः पंतप्रधान महोदय यांच्यासमोर कबूल केलेलं आहे आणि महाराष्ट्रात पुनर्प्रस्थापित युती करू असं आश्वासन दिलं होतं, पण त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही, असं म्हणत केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
बाळासाहेबांचे नाव आम्हाला दोष देण्यापुरता वापरत आहेत. पुन्हा जर सावरकरांचा अपमान केला तर आम्ही तुमच्या सोबत राहणार नाही असा इशारा दिला असता, असा टोलाही केसरकरांनी लगावला.
काही झालं की बीजेपी ला कठड्यात उभा करायचं. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना एकदा साधं नाव बदलायचा विषय काढला नाही. ज्या वेळेला सत्ता गेली त्या वेळेला कॅबिनेटची बैठक बोलून तुम्ही संभाजीनगर नाव देतात, त्यातही दहा कॅबिनेटचे मंत्री गैरहजर असतात. कॅबिनेटच्या बैठकीत काय घडलं हे मला माहिती नाही. हे तुमचे सीनियर नेते महाविकास आघाडीचे नेते शरद पवार बोलतात याचा अर्थ काय होतो, असा सवालही केसरकरांनी केला.
जयंत पाटील यांना लगावला टोला
'एक मला आजपर्यंत असं वाटत होतं, काही नेते उशिरापर्यंत झोपतात आणि जे उशिरा झोपतात त्यांना स्वप्न दिसतात. मात्र अजितदादा आणि जयंत पाटील हे लवकर उठणारे नेते आहेत त्यांना देखील असे स्वप्न पडायला लागले आहेत, असा टोला केसरकर यांनी राष्ट्रपती राजवट लागण्याच्या मुद्यावर लगावला आहे.
'सरकार कुठल्या परिस्थितीत जातीय दंगली घडू देणार नाही. मला असं वाटतं सरकार याबाबतीत कठोर पावले घेईल आणि कुठल्याही परिस्थितीत जातीय दंगली घडू देणार नाही. सीसीटीव्ही समोर आले असतील पोलीस तपासून त्याच्यावरती दोषींवर कारवाई करतील, असं आश्वासनही केसरकरांनी दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.