लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 5 फेब्रुवारी : सातपूर परिसरातील राधाकृष्णनगर येथे व्यावसायिक कुटुंबातील तिन्ही पुरुषांनी आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. ही घटना ताजी असतानाच आणखी एका घटनेने नाशिक जिल्हा हादरला आहे. सावकाराच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून दोन भावांनी विष घेतलं. दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. आत्महत्या करणाऱ्यांकडे सुसाईड नोट आढळून आली आहे. काय आहे प्रकरण? नाशिक जिल्ह्यात सावकारीचे मोठे जाळे पसरलं आहे. या सावकारांच्या जाचाला कंटाळून काहींनी आपलं जीवन संपवलं आहे. काही दिवसांपूर्वीच एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केली होती. यातच आता दोन भावांनी सावकारीच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून विष पिले. यात एकाच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. सावकाराने पैशासाठी दोघांना बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रुग्णालयातच गोंधळ घातला. त्यांनी मृतदेह घेण्यास दिला नकार दिला असून नाशिक पुणे रोडवर रास्ता रोको केला आहे. जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. मागच्या आठवड्याच तिघांची आत्महत्या नाशिकच्या सातपूर परिसरातील राधाकृष्णनगर येथे व्यावसायिक कुटुंबातील तिन्ही पुरुषांनी आत्महत्या केली. दोन्ही तरुण मुलांनी घरातील तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गळफास घेऊन जीवन संपविले. सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक शिरोडे (वडील, वय 55), प्रसाद शिरोडे (मोठा मुलगा, वय 25), राकेश शिरोडे (वय 23) अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या तिघांनी एकाच घरात तीन वेगवेगवेगळ्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शिरोडे कुटुंबिय हे अशोकनगर शेवटचा बसस्टॉप परिसरात फळांचा व्यवसाय करीत होते. वाचा - पुणे : पत्नी विरहात दुःखी आजोबांना तरुणीने हेरलं; एक कोटींचा लागला चुना शिरोडे कुटुंबीय हे मूळचे देवळा तालुक्यातील उमराणे येथील रहिवासी आहेत. गेल्या 10 वर्षांपूर्वी ते नाशिकमध्ये व्यवसायानिमित्त आले. राधाकृष्ण नगर परिसरात त्यांचे घर आहे. वडिल दीपक हे अशोक नगर शेवटचा बसस्टॉप येथील भाजी बाजाराजवळ फळ विक्री करत होते. तर त्यांची मुले प्रसाद आणि राकेश हे चारचाकी वाहनांवर फळविक्रीचा व्यवसाय शिवाजी नगर परिसरात करायचे.
आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने शिरोडे कुटुंबिय कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे ते नैराश्यात होते. 29 जानेवारीला दुपारच्या सुमारास दीपक शिरोडे यांच्या पत्नी काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या होत्या. यावेळी वडिलांसह दोन्ही मुलांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घरातील तिन्ही खोलींमध्ये असलेल्या पंख्याला गळफास घेत आपले जीवन संपविले. थोड्या वेळाने आई घरी येताच तिने दरवाजा ठोठावला. पण, आतून कुणीही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्या घाबरल्या. परिसरातील नागरिकांना त्यांनी आवाहन केले. त्यानंतर दरवाजाची कडी तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर दरवाजा तोडून आत प्रवेश करताच या मातेला आपल्या पतीसह दोनही तरुण मुलांनी गळफास घेतल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे या मातेने जोरदार हंबरडा फोडला.