मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पुणे : पत्नी विरहात दुःखी आजोबांना तरुणीने हेरलं; एक कोटींचा लागला चुना

पुणे : पत्नी विरहात दुःखी आजोबांना तरुणीने हेरलं; एक कोटींचा लागला चुना

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पुणे शहरातील उच्चभ्रु घरातील एका 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या पत्नीचे निधन झाले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 5 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आर्थिक फसवणुकीचेही प्रकार सातत्याने समोर येत आहे. सध्या डेटिंग अॅपच्या माध्यमातूनही अनेकांची फसवणुक केली जात असल्याच्या धक्कादायक घटना घडत आहे. यातच पुण्यातून मोठी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डेटिंग अॅपच्या माध्यमातून फसवणूक करत या आजोबाला तब्बल एक कोटींमध्ये फसवण्यात आले.

नेमकं काय घडलं -

पुणे शहरातील उच्चभ्रु घरातील एका 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या पत्नीचे निधन झाले आहे. यामुळे ते एकटेच राहत होते. याचदरम्यान, नेहा शर्मा या तरुणीने ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईल क्रमांकावरुन त्यांना संपर्क साधला. तसेच त्यांना डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणींसोबत मैत्रीची संधी असल्याचे आमिष दाखवले. इतकेच नव्हे तर पुन्हा विवाह करता येईल, असेही सांगितले.

यासंदर्भात रजत सिन्हा, नेहा शर्मा या दोन्ही सायबर चोरट्यांनी त्यांना वारंवार फोन केले. मे 2022 पासून हा प्रकार सुरू होता. के. बी. टेलीकॉम या डेटिंग सर्व्हिस कंपनीच्या नावाखाली या दोन्ही सायबर चोरट्यांनी त्यांची 1 कोटी रुपयांत फसवणूक केली. रजत सिन्हा, नेहा शर्मा अशी या सायबर चोरट्यांची नावे आहेत.

हेही वाचा - पुण्यात धक्कादायक प्रकार, नासाच्या नावाने शेकडो लोकांची कोट्यावधींची फसवणूक

डेटिंग सेवा घेण्याकरिता सुरुवातीला पैसे कंपनीत पैसे भरावे लागतील. ते पैसे भरल्यावर वेगवेगळी कारणे देत रिफंडबेल चार्जेस असल्याचे सांगत आणखी पैसे उकळले. ही रक्कम त्यांना वेगवेगळ्या खात्यात भरण्यास सांगितले गेले. या दोघांच्या सांगण्यावरुन तक्रारदाराने विविध खात्यात पैसे भरले. मात्र, यानंतर त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

तुम्ही बेकायदेशीरपणे डेटिंग सर्व्हीस घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता तुमची समाजात बदनामी करु, तुमच्यावर गुन्हा दाखल करु, अशी धमकी देऊन वर्षभर त्यांच्याकडून पुन्हा पैसे उकळले. तक्रारदाराने आतापर्यंत तब्बल एक कोटी दोन लाख रुपये त्यांना दिले. मात्र, यानंतरही आरोपींकडून वारंवार पैशांची मागणी होत होती. अखेर या ज्येष्ठ नागरिकांने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर रजत सिन्हा व नेहा शर्मा यांच्यांविरोधात तक्रार दाखल केल्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सायबर चोरट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. डेटिंग सर्व्हिसला बळी पडू नये आणि फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.

First published:

Tags: Crime news, Dating app, Financial fraud, Money fraud, Online dating, Online fraud, Pune