जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nashik : स्वामी नारायण मंदिर होणार सामाजिक कार्याचे केंद्र VIDEO

Nashik : स्वामी नारायण मंदिर होणार सामाजिक कार्याचे केंद्र VIDEO

Nashik : स्वामी नारायण मंदिर होणार सामाजिक कार्याचे केंद्र VIDEO

नाशिकच्या तपोवन परिसरात केवडीबन येथे साकारण्यात आलेल्या स्वामी नारायण मंदिराच्या माध्यमातून समाजसेवेचे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

  • -MIN READ Nashik,Nashik,Maharashtra
  • Last Updated :

    नाशिक 2 ऑक्टोबर : नाशिकच्या तपोवन परिसरात केवडीबन येथे भव्य,दिव्य बीएपीएस स्वामी नारायण मंदिर साकारण्यात आले आहे. मंदिरांची नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या वैभवात स्वामी नारायण मंदिरामुळे मोठी भर पडली आहे. तपोवन परिसरात केवडीबन येथे साकारलेले बिएपिएस स्वामी नारायण मंदिर हे सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. सर्वधर्म समभावाच्या मूल्यांची जपणूक करत हे भव्य मंदिर निर्माण करण्यात आले आहे. या मंदिरात सर्व  देवदेवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच धर्मातील बांधव मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. नाशिकच्या तपोवन परिसरात केवडीबन येथे साकारण्यात आलेल्या स्वामी नारायण मंदिराच्या माध्यमातून समाजसेवेचे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. बिएपिएस संस्थान गेल्या अनेक वर्षांपासून समाज हिताचे काम करत आहे. कोणतीही आपत्ती आली तरी संस्थानच्या वतीने मदतीचा हात कायमच पुढे असतो. प्रमुख स्वामी महाराज यांचे आपत्ती काळात मदत करणे ठरलेले  होते. दुसऱ्यांना सुख,समाधान देण्यातच आपला आनंद आहे. कोणीही अडचणीत असेल तर त्याला मदत करणे गरजेचे आहे, असं स्वामी महाराज सांगत होते. तोचं मंत्र त्यांनी आपल्या अनुयायांना दिला आहे.

    हेही वाचा :  Nashik : स्वामी महाराजांच्या संकल्पनेतून उभं राहिलं मंदिर, पाहा निर्मितीची प्रेरणा Video

    कोरोना काळात ही केली मदत 

    बीएपीएस संस्थानाच्या माध्यमातून कोरोना काळात विविध प्रकारची मदत करण्यात आली. फक्त महाराष्ट्र, गुजरातच नव्हे तर संपूर्ण भारतात मदत केली गेली. बेड,ऑक्सिजन,औषधांचा पुरवठा करण्यात आला. विशेष म्हणजे भारतातच नव्हे तर दुसऱ्या देशात देखील मदत केली जाते. 2001 मध्ये भुजमध्ये आलेल्या भूकंपात ही मदत करण्यात आली होती. युक्रेन,रशियामध्ये झालेल्या युद्धात ही जे ग्रस्त नागरिक आहेत त्यांना विविध पद्धतीने मदत पोहचवली गेली असल्याची माहिती बीएपीएस स्वामी नारायण संस्थानचे प्रवक्ते आदर्शजीवन स्वामी यांनी दिली आहे. नाशिकच्या पवित्र भूमी मधून देखील हा मदतीचा ओघ कायम सुरू राहील, असा विश्वासही आदर्शजीवन स्वामी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. ** **गुगल मॅपवरून साभार

    जाहिरात

    कुठे आहे स्वामी नारायण मंदिर? बीएपीएस श्री स्वामी नारायण मंदिर, पंचवटी, नाशिक तपोवन केवडीबन (पिन कोड : 422003) नाशिक शहरातील मुख्य बसस्थानकापासून साधारण 8 ते 9 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे.सरकारी बस ने किंवा खाजगी वाहनाने आपण तिथपर्यंत पोहचू शकता,

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: nashik
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात