मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Shocking Video : नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार, पुराच्या पाण्याने ओलांडली धोक्याची रेषा

Shocking Video : नाशिकमध्ये पावसाचा हाहाकार, पुराच्या पाण्याने ओलांडली धोक्याची रेषा

नाशिकमधील अनेक गावांशी संपर्कही तुटला आहे.

नाशिकमधील अनेक गावांशी संपर्कही तुटला आहे.

नाशिकमधील अनेक गावांशी संपर्कही तुटला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
नाशिक, 11 जुलै : नाशिकच्या (Nashik Rain Update) अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसाचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नाशिकमधील सुरगाणा तालुक्यात पावसाचा हाहाकार (Heavy to heavy Rain) सुरू आहे. मुसळधार पावसामुळे 7 नद्यांना पूर आले आहे. तर अनेक ठिकाणी रस्ते, पूल पाण्याखाली गेल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू असून सुरगाणा तालुक्यात तर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. सलग होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नदी-नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. नार-पार, अंबिका, वाझडी, तान-मान, कावेरी पिंजाळ, दमणगंगा या नद्या तर धोक्याच्या पातळी जवळ पोहचल्या असून पाऊस असाच सुरू राहीला तर या नद्या धोक्याच्या पातळी ओलांडतील. दुसरीकडे पुराच्या पाण्याखाली रस्ते आणि छोटे पूल गेले असल्यामुळें पिंपळसोंड, खुंटविहीर, शिराळा, अळीवपाडा, उंबरवाडा, दोडीपाडा, म्हैसखडक, बोरचोंड, कुकुडमंडा, वाघाडी, आमदा, वांगण, वाजवड, उंबुरणे, मंनखेड आदी गावाचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पारंपरिक पूरमापनाची ओळख असलेला तुटोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी लागल्याने पुराच्या पाण्याने धोक्याची रेषा ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे सापुतारा घाट रस्त्यावर खडक कोसळल्याचं वृत्त आहे. दरड कोसळल्याने सापुतारा-नाशिक आंतरराज्य महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने अडकली असून जेसीबीलाही येथील दरड काढणं शक्य होत नसल्याचं सांगितलं जात आहे. सप्तशृंगी गड येथे ढगफुटी सदृश्य पाऊस  नाशिकमध्येही तुफान पाऊस सुरू आहे. नाशिकच्या (heavy to heavy rain on Saptashrungi fort in Nashik) सप्तशृंगी गड येथे ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू असल्याचा एका व्हिडीओदेखील समोर आला आहे. मंदिराच्या वरच्या बाजूने डोंगरावरून येणाऱ्या पाण्यामुळे पायऱ्यांवरुन धबधबा वाहत असल्या सारखा दिसत आहे. सप्तशृंगी मंदिर येथून खाली पायऱ्यांवरून पाण्यासोबतच चिखल-दगड वाहून येत असल्याने काही भाविकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. या सर्वात सात भाविक किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
First published:

Tags: Nashik, Rain

पुढील बातम्या