मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

साईबाबा आणि भक्तांमधील अडथळा दूर होणार; चरणाला स्पर्श करून घ्या दर्शन!

साईबाबा आणि भक्तांमधील अडथळा दूर होणार; चरणाला स्पर्श करून घ्या दर्शन!

साई भक्तांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे.

साई भक्तांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे.

साई भक्तांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Shirdi, India
  • Published by:  Meenal Gangurde

शिर्डी, 10 नोव्हेंबर : साई भक्तांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. शिर्डीत साईबाबांच्या समाधीसमोर लावण्यात आलेल्या काचा हटवण्याचा महत्वपूर्ण निर्णय साई संस्थानने घेतला आहे. त्यामुळे भाविकांना पूर्वीप्रमाणे समाधीला हात लावून दर्शन घेता येणार आहे. शिर्डी ग्रामस्थ आणि साईबाबा संस्थान-प्रशासन यांच्यात पार पडलेल्या बैठकीत समाधी समोरील काचा हटवण्यासोबतच आणखी काही निर्णय घेण्यात आलेत आहेत.

साई भक्तांचे दर्शन अधिक सुकर व्हावे यासाठी शिर्डीकरांच्या मागणीनुसार सामान्य भाविकांना साई मंदिरातील समाधीजवळ लावलेल्या काचा काढण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता सामान्य साईभक्‍तांना समाधीला हात लावून दर्शन घेणे शक्य होणार आहे. व्दारकामाई मंदिरातील आतील बाजूस भाविकांना आता प्रवेश दिला जाणार आहे. त्याबरोबरच साईंची आरती सुरू असताना भाविकांना गुरुस्थान मंदिराची परिक्रमा पूर्वीप्रमाणे करता येणार आहे.

Nashik : ऐतिहासिक चलनाच्या अभ्यासासाठी द्या 'इथं' भेट, अनेक प्रश्नांची मिळतील उत्तरं! Video

साईबाबांनी सर्व धर्म समभावाची शिकवण जगाला दिली. मात्र साईमंदिरातच भक्तांमध्ये भेदभाव केला जात होता. व्हिआयपींसाठी समाधीवरील काच काढून त्यांना दर्शन दिले जात होते. मात्र आता या निर्णयामुळे सामान्य साईभक्तांनाही व्हिआयपींप्रमाणे समाधीला स्पर्श करून दर्शन घेता आल्याने साईभक्तही आनंदी झाले आहे.  श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणा-या साईबाबांच्या शिर्डीत व्हिआयपींवर संस्थान प्रशासनाची श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या जातात आणि सामान्य साईभक्त मात्र तासनतास रांगेत तिष्ठत उभा असतो. या निर्णयामुळे भक्त आणी बाबा यांच्या मधील दुरावा काहीसा कमी होणार आहे.

First published:

Tags: Nashik, Sai Baba Of Shirdi (Deity)