जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Sanjay Raut : श्रीकांत शिंदेंचा प्रश्न येताच का थुंकलो? संजय राऊतांची सारवासारव

Sanjay Raut : श्रीकांत शिंदेंचा प्रश्न येताच का थुंकलो? संजय राऊतांची सारवासारव

संजय राऊत श्रीकांत शिंदेंच्या प्रश्नावर थुंकले

संजय राऊत श्रीकांत शिंदेंच्या प्रश्नावर थुंकले

श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नावर पत्रकार परिषदेत केलेल्या कृतीमुळे संजय राऊतांवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. यानंतर आता संजय राऊत यांनी सारवासारव केली आहे.

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

नाशिक, 2 जून : श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नावर पत्रकार परिषदेत केलेल्या कृतीमुळे संजय राऊतांवर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात एक प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी संजय राऊतांनी थू म्हणत थुंकण्याची कृती केली. यापूर्वी देखील त्यांनी संजय शिरसाट यांच्याबाबत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना अशीच कृती केली होती. संजय राऊत यांच्या या कृतीवरून सत्ताधारी भाजप-शिवसेना नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. एवढच नाही तर संजय राऊत यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटकेचीही मागणी केली आहे. थुंकण्याचा हा वाद वाढल्यानंतर आता संजय राऊत यांनी सारवासारव केली आहे. नाशिकमधल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ते जोरात हसले आणि थुंकण्यावर बंदी आहे का? असा सवाल केला. तसंच सरकारने तसा अध्यादेश काढावा, असा टोलाही लगावला. माझ्या जिभेला त्रास झाला, माझ्या घरात मी होतो. माझी जीभ दाताखाली आली म्हणून मी थुंकलो. कुणाला वाटत असेल त्यांच्या नावाने थुंकलो हा त्यांचा प्रश्न आहे. काही लोकांचं नाव आलं आणि जीभ दाताखाली आली, असं संजय राऊत म्हणाले.

जाहिरात

नरेश म्हस्के यांची टीका ‘सत्ता गेल्यानं संजय राऊत हतबल झाले आहेत. आज थुंकत आहेत, थोड्याच दिवसात कपडे काढून रस्त्यावर दगड मारत फिरतील. संजय राऊत यांच्याबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी’. असं शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात