नाशिक, 21 डिसेंबर : भग्न झालेल्या देवी देवतांचे जुने फोटो आणि मूर्ती आपण इकडे तिकडे अस्ताव्यस्त टाकून देतो किंवा नदीत विसर्जित केले जातात. अथवा पिंपळाच्या झाडाखाली देखील अनेक वेळा आपल्याला फोटो आणि मूर्ती ठेवलेल्या दिसून येतात. मात्र,याच फोटो आणि मूर्ती संकलित करण्याचे काम संपूर्णम सेवा फाऊंडेशन करत आहे. नाशिकमधून या अभिनव उपक्रमाला सुरुवात झाली आहे. तर मुंबई आणि पुण्यासह देशभरात ही मोहीम पोहचली आहे.
अनेक स्वयंसेवक जोडले गेले
ॲड.तृप्ती गायकवाड यांच्या संकल्पनेतून ही मोहीम सुरू झाली आहे. या उपक्रमाची व्याप्ती सद्या वाढत आहे. राज्यभरासह देशभरातील स्वयंमसेवक या मोहिमेत जोडले गेले आहेत. गेल्या तीन वर्षात जवळपास 80 हजार फोटो आणि मूर्ती संपूर्णम सेवा फाऊंडेशनने संकलित केल्या आहेत. विशेष म्हणजे काही नागरिक कुरिअरद्वारे देखील संपूर्णम सेवा फाऊंडेशन पर्यंत फोटो आणि मूर्ती पोहचवत आहेत. व्यवस्थितरित्या या सर्व फोटोफ्रेमचे आणि मूर्तीचे विघटन केले जाते. ज्या फ्रेम चांगल्या आहेत. त्यापासून विविध शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात.
अंधत्वावर मात करुन स्वाभिमानी आयुष्य जगणारे राजू, डोळसांनीही धडा घ्यावा असा पाहा Video
मूर्तींची अवहेलना थांबावी हाच उद्देश
अनेक वेळा आपण बघतो नागरिक आपल्या घरातील तुटलेल्या मूर्ती इकडे तिकडे टाकतात. असंच एकदा मी गोदावरीला पुर आलेला असताना बघण्यासाठी गेले होते. मी तिथे उभी असताना एक व्यक्ती तिथे आला त्याने आपल्या गाडीतून काही देवी-देवतांच्या तुटलेल्या फ्रेम काढल्या आणि गोदावरीच्या पुरात टाकणार तोच मी त्याला अडवलं आणि त्याला विचारलं तुम्ही हे नदीत का टाकतात. यामुळे प्रदूषण वाढत आणि देव- देवतांचा अपमान देखील होतो. मग तो म्हटला मी काय करू? हे तर नदितच विसर्जीत केलं जातं. मी त्यांना सांगितले या फोटो फ्रेम मधील कागदाची जी प्रिंट आहे ती काढा त्या कागदाचा लगदा करा आणि तुमच्या घरातील तुळशी वृंदावनात टाका.
त्यात त्याचं विघटन होईल आणि या फ्रेमची दुरुस्ती करून तुम्ही तुमच्या घरात इतर ठिकाणी वापरू शकता. हे त्याने ऐकल्यानंतर त्याने होकार दिला. आणि तिथे न टाकता निघून गेला. तेव्हा माझ्या लक्षात आले की आपण आज एका व्यक्तीला असं करण्यापासून रोखल आहे. तर आपण इतर ही व्यक्तीना असं समजावून सांगू शकतो आणि तेव्हापासूनच संपूर्णम सेवा फाऊंडेशनची सुरुवात झाली, असं संपूर्णम सेवा फाऊंडेशनच्या अध्यक्षा ॲड.तृप्ती गायकवाड यांनी सांगितले.
स्पर्धा परीक्षेत अपयश आलं म्हणून काय झालं... पाणीपुरी व्यवसायातून घेतली नवी भरारी, Video
जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावं
जुने फोटो आणि मूर्ती संकलनासाठी दिल्यास आपल्या देवी-देवतांची अवहेलना थांबते आणि पर्यावरणाचे देखील रक्षण होते. विशेष म्हणजे ज्या व्यक्तीने फोटोफ्रेम दिल्या त्यांच्या नावाने आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने उत्तरपुजा करतो. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावं, असं आवाहन ॲड.तृप्ती गायकवाड यांनी केले आहे.
इथे करा संपर्क
जर तुमच्या घरात किंवा आजूबाजूला काही अशा देव-देवतांच्या फोटोफ्रेम, मूर्ती पडलेल्या दिसल्या तर www.sampurnam.org या वेब साईटवर संपर्क करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.