जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / gram panchayat election result : संभाजीराजेंचा करिश्मा, स्वराज्य संघटनेनं उघडलं खातं, शिंदे गटाला भोपळा

gram panchayat election result : संभाजीराजेंचा करिश्मा, स्वराज्य संघटनेनं उघडलं खातं, शिंदे गटाला भोपळा

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आक्रमक झाले असून स्वराज्य संघटना स्थापन केली आहे.

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आक्रमक झाले असून स्वराज्य संघटना स्थापन केली आहे.

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आक्रमक झाले असून स्वराज्य संघटना स्थापन केली आहे.

  • -MIN READ Nashik,Maharashtra
  • Last Updated :

नाशिक, 19 सप्टेंबर : . राज्यातील 16 जिल्ह्यांतील 547 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आक्रमक झाले असून स्वराज्य संघटना स्थापन केली आहे. पहिल्याच ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये स्वराज संघटनेनं आपली चमक दाखवली आहे. नाशिकमधील ग्रामपंचायत निवडणूक जिंकली आहे. नाशिक तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी काल पार पडलेल्या मतदानानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या १६ ग्रामपंचायत पैकी ८ ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून, यात ८ ग्रामपंचायतीत शिवसेना २,भाजप १, राष्ट्रवादी ३, काँग्रेस १ स्वराज्य संघटना १ असा निकाल हाती आला आहे. नाशिक तालुक्यात शिंदे गटाला खातं उघडता आलं नसलं तरी संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेने नाशिक तालुक्यात एका जागेवर खातं उघडलं आहे. ग्रामपंचायतचा निकाल खालील प्रमाणे नाशिक - एकूण ग्रामपंचायत- 16 शिवसेना - 2 शिंदे गट - ० भाजप- 1 राष्ट्रवादी- 3 काँग्रेस- 1 स्वराज्य संघटना -०१ इतर - ० दरम्यान, राज्यातील 608 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.  608 ग्रामपंचायतींपैकी 51 जागा बिनविरोध झाल्या आहेत. आतापर्यंत 112 ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला आहे. भाजपने सर्वाधिक 56 जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादीने 29 जागा जिंकल्या आहेत. तर शिंदे गटाने 12 जागांवर बाजी मारली आहे. काँग्रेसने 12 जागा जिंकल्या आहे. तर शिवसेना ही चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. शिवसेनेनं आतापर्यंत 4 जागांवर बाजी मारली आहे. त्याआधी 51 जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 15 जागा जिंकल्या आहेत. तर शिंदे गटाने 4 तर शिवसेनेनं 2 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने 6 जिंकल्या असून इतर 9 जागांवर विजयी झाले आहे.  महाविकास आघाडीने एकूण 23 जागा बिनविरोध जिंकल्या आहेत. तर भाजप आणि शिंदे गट युतीने 19 जागा जिंकल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात