बब्बू शेख, प्रतिनिधी मनमाड, 26 सप्टेंबर : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला. उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या विवाहितेच्या मृतदेह नातेवाईकांनी थेट पोलीस ठाण्यात आणून ठेवल्याची घटना घडली. तसेच महिलेच्या मृत्यूनंतर डॉक्टरवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे विवाहितेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला. तसेच नातेवाईकांनी विवाहितेचा मृतदेह थेट पोलीस स्थानकात आणल्याची घटना चांदवड येथे घडली आहे. प्रियंका निर्भवने असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला गर्भवती होती. यानंतर या महिलेला प्रसूतीसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रसूतीनंतर तिची प्रकृती खराब झाली. तिच्यावर योग्य उपचार करण्यात आले नाही, म्हणून तिचा मृत्यू झाला, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच ही मागणी करत मृत महिलेचा मृतदेह पोलीस स्थानकात आणून ठेवला. यावेळी पोलीस स्टेशनच्या आवारात मोठ्या प्रमाणात नागरिक जमले होते. तसेच याठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोलन करत दोषी डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे
नाशिक : प्रियकराच्या मदतीने डॉक्टर पतीला इंजेक्शन देऊन ठार मारण्याचा प्रयत्न नाशिक येथील एका खासगी रुग्णालयातील 45 वर्षीय पीडित डॉक्टरला त्याच्या 40 वर्षीय पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून संगनमताने रुग्णालयात बोलावले आणि याठिकाणी वाद घातला. यानंतर डॉक्टरला दोघांनी मिळून रुग्णालयातीलच एका खोलीत डांबले. आणि तेथे त्यांना इंजेक्शनद्वारे भुलीच्या औषध देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. हेही वाचा - 12 वर्षीय मुलाची निर्भयासारखी अवस्था, प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड अन् 4 नराधमांकडून क्रूर कृत्य यानंतर डॉक्टरच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित महिला व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. म्हसरुळ पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित महिलेचे विवाहबाह्य अनैतिक संबंध होते आणि याबाबतची कुणकुण तिच्या डॉक्टर पतीला लागली होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे.