मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

दिल्लीत 12 वर्षीय मुलाची निर्भयासारखी अवस्था, प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड अन् 4 नराधमांकडून क्रूर कृत्य

दिल्लीत 12 वर्षीय मुलाची निर्भयासारखी अवस्था, प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड अन् 4 नराधमांकडून क्रूर कृत्य

अर्धमेल्या अवस्थेत मुलाला सोडून देण्यात आलं, पोलिसांनी मुलाची अवस्था पाहिल्यानंतर त्यांनाही धक्का बसला.

अर्धमेल्या अवस्थेत मुलाला सोडून देण्यात आलं, पोलिसांनी मुलाची अवस्था पाहिल्यानंतर त्यांनाही धक्का बसला.

अर्धमेल्या अवस्थेत मुलाला सोडून देण्यात आलं, पोलिसांनी मुलाची अवस्था पाहिल्यानंतर त्यांनाही धक्का बसला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आतापर्यत महिला असुरक्षित असल्याचा मुद्दा चर्चिला जात होता. आता मात्र राजधानीतच मुलंही सुरक्षित नसल्याची घटना घडली आहे. या मुलाची भयंकर अवस्था करण्यात आली आहे. त्याचा प्रायव्हेट पार्टही जखमी झाला आहे. त्याची अवस्था पाहून कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे.

दिल्लीत एका 12 वर्षी मुलासोबत क्रूर कृत्य केल्याचं समोर आलं आहे. सीलमपूर भागातील 4 जणांनी 12 वर्षांच्या मुलावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर त्याला जबर मारहाण केली. यानंतर आरोपींनी सर्व मर्यादा ओलांडल्या आणि मुलाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घुसवला. घटनेच्या चार दिवसात पोलिसांनी सर्व माहिती एकत्र केली आहे. रविवारी सायंकाळी उशिरा दिली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

आधी लग्नाचं आमिष नंतर अपहरण, 22 वर्षांच्या तरुणीसोबत तिघांचं घृणास्पद कृत्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलावर एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तब्बल 3 अल्पवयीन मुलांनी त्याचे शोषण केले. यात एक चुलत मुलगाही आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी ट्विट करून लिहिलं आहे की, दिल्लीत मुलंही सुरक्षित नाहीत. ओका 12 वर्षांच्या मुलावर 4 जणांनी अत्याचार केला आणि काठीने मारहाण केली. अर्धमेलेल्या अवस्थेत त्याला सोडून देण्यात आलं. या प्रकरणात एमआयआर दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात एक आरोपीला अटक करण्यात आली असून तिघेजण अद्याप फरार आहेत. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित आणि कथित आरोपी शेजारी आणि मित्र आहेत. ते समान वयाचे आहेत. आरोपींमध्ये एक चुलत भाऊदेखील आहे.

First published:

Tags: Crime news, Delhi, Gang Rape