नाशिक, 30 मार्च : म्हाळसाकोरे येथील आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकरी डॉ. प्रियंका पवार या एका तरुणासाठी देवदूत बनल्या आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे तरुणाला जीवदान मिळाले आहे. विषप्राशन केलेल्या तरुणावर म्हाळसाकोरे येथे प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र त्याला तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागणार होते. मात्र रुग्णवाहिकेचा चालक सुटीवर होता. त्यामुळे या तरुणाला निफाड येथील ग्रामीण रुग्णालयात कसं नेणार असा प्रश्न निर्माण झाला.
गर्भवती असूनही चालवली रुग्णवाहिका
त्यावेळी डॉ. प्रियंका पवार यांनी कोणताही मागचा-पुढचा विचार न करता स्व:ता रुग्णवाहिकेचं स्टेरिंग हाती घेऊन या तरुणाला उपचारासाठी निफाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. विशेष म्हणजे प्रियंका पवार या गर्भवती आहेत. स्व:ता गर्भवती असताना देखील त्यांनी कुठलाही मागचा-पुढचा विचार न करता या तरुणाला उपचारासाठी निफाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं.
प्रियंका पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
तरुणाने विष प्राशान केले होते. त्याला तातडीनं उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागणार होते. मात्र म्हाळसाकोरे येथील आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेचा चालक सुटीवर असल्यानं रुग्णवाहिका कोण चालवणार असा प्रश्न निर्माण झाला. डॉक्टर प्रियंका यांनी गर्भवती असताना देखील आरोग्यसेवक असलेल्या आपल्या सासऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी स्व:ता रुग्णवाहिका चालवत निफाड ग्रामीण रुग्णालय गाठले. सध्या या रुग्णावर निफाडमध्ये उपचार सुरू आहेत. प्रियंका पवार यांच्या या धाडसाचं जिल्हाभरातून कौतुक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.