लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 3 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. नाशिक जिल्ह्यातही गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत आहेत. त्यातच अंगात दैवी शक्ती आल्याचे भासवून भोंदूबाबाने एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिकच्या उपनगर भागात हा संतापजनक समोर आला आहे. याप्रकरणी भोंदू बाबासह आणखी तिघांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विष्णू काशिनाथ वारुंगसे उर्फ देवबाबा असे आरोपीचे नाव आहे. त्याने एका महिलेवर त्याच्या राहत्या घरी आणि इतर ठिकाणी वारंवार महिलेच्या संमतीविना शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तर याबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आरोपीने महिलेच्या अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवले होते. तसेच घर घेऊन देण्याचे आमिष दाखून महिलेकडून सुमारे 5 लाख रुपये घेऊन तिची फसवणूक केली, असे पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. तर या संपूर्ण घटनेत विष्णू काशिनाथ वारुंगसे उर्फ देवबाबा याची पत्नी मुलगा आणि मुलगी यांचा देखील समावेश असल्याने देवबाबा सह त्याच्या त्याची पत्नी सुनीता विष्णु वारुंगसे ,उमेश विष्णू वारुंगसे व आणि देवबाबा याची मुलगी अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस अधिक तपास सुरू आहे. हेही वाचा - सख्खेच उठले जीवावर! जमिनीच्या वादातून काका आणि चुलतभावावर प्राणघातक हल्ला, घडलं भयानक…
शर्ट चोरला म्हणून नाशिकमध्ये तरुणासोबत भयानक कृत्य -
नाशिक त्रंबकरोडवर असलेल्या मुहूर्त या रेडीमेड कपड्यांचा मॉलमधील एका कर्मचाऱ्याला मॉलमधून शर्ट चोरला या कारणावरून अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. मॉल मालकाच्या सांगण्यावरून मॉलमध्ये असलेल्या बाऊन्सर्सने ही मारहाण केली आहे. या मारहाणीत कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहे. विशाल वावुळकर, असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मॉलच्या मालकासह खाजगी बाउन्सरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.