यवतमाळ, 3 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या प्रमाणात मोठी वाढ होत आहे. सातत्याने राज्यातून हत्येच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जागेच्या घरगुती कारणांवरून एकाचा खून करण्यात आला आहे. तर या घटनेत एक जण गंभीर जखमी आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - जागेच्या घरगुती कारणांवरून पुतण्याने चुलत भाऊ आणि काकावर प्राणघातक हल्ला केला. ही धक्कादायक घटना यवतमाळ शहरातील पांढरकवडा रोडवरील हिंदू स्मशान भूमी येथे घडली. कौटुंबिक वाद विकोपाला जाऊन जागेच्या घरगुती कारणांवरून लोखंडी रॉडने हा हल्ला केला गेला. जागेच्या कारणावरून झाला वाद झाला होता. या वादाचे रुपांतर प्राणघातक हल्ल्यात झाले. या हल्ल्यात चुलत भाऊ राहुल नरेंद्र पाली (27) हा जागेवरच ठार झाला आहे. तर काका नरेंद्र जगन्नात पाली (55) गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी भेट दिली. दरम्यान, या घटनेने मोठी खळबळ उडाली असून पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. हेही वाचा - नववर्षाच्या रात्री 2 वा. हॉटेलच्या बाहेर स्कूटी, मित्रांचा गराडा; दिल्ली हॉरर केसमध्ये मोठा खुलासा नवरा-बायको फुल टाईट, दारूच्या नशेत वाद झाल्यानंतर पतीने उचललं भयानक पाऊल - यवतमाळ शहरातील वाघापूर परिसरातील पंचशीलनगरमध्ये घडली. दारूच्या नशेत नवऱ्याने बायकोला केलेल्या मारहाणीत ती गंभीर जखमी झाली. ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. यानंतर सायंकाळी महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. पत्नी आणि पत्नी दोघेही दारूच्या आहारी गेले होते आणि नशेत असताना त्यांचे भांडण झाले. यातून ही घटना घडली. वैशाली उत्तम गाडेकर (35) असे मृत महिलेचे नाव आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.