जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Breaking news : त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या 'त्या' प्रकाराची फडणवीसांकडून गंभीर दखल; गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

Breaking news : त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या 'त्या' प्रकाराची फडणवीसांकडून गंभीर दखल; गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणाची फडणवीसांकडून गंभीर दखल

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणाची फडणवीसांकडून गंभीर दखल

नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या कथीत घटनेची फडणवीसांकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.

  • -MIN READ Nashik,Nashik,Maharashtra
  • Last Updated :

नाशिक, 16 मे :  नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी एक विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याच्या कथित घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.  ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्यावर्षीच्या घटनेचीही चौकशी करणार आहे, गेल्या वर्षी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती. काय आहे नेमकी घटना?  समोर येत असलेल्या माहितीप्रमाणे  त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात एक विशिष्ट जमाव जमला होता. त्यांच्याकडून कथितरित्या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे. या घटनेची आता गृहमंत्रालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआटी स्थापन करावी असं फडणवीसांनी म्हटलं आहे. ही एसआयटी गेल्या वर्षीच्या प्रकरणाची देखील चौकशी करणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nashik
  • First Published :
जाहिरात
जाहिरात