नाशिक, 25 मे : प्रेमाच्या धुंदीत अनेकदा तो काय करतो हे त्याला कळत आहे.
(Love at First Side) याच प्रेमाच्या धुंदीत अनेक प्रेमवीर चुकीचे पाऊलही उचलल्याचे तुम्ही वाचले असेल. असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये
(Nashik) समोर आला आहे. नाशिकमध्ये एका विवाहितेसोबत
(Married Woman) हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले.
काय आहे घटना
एक प्रेमवीर एका विवाहितेला दररोज सकाळी 'गुड मॉर्निंग, आय लव्ह यू', असे मेसेज पाठवायचा. इतकेच नाही तर मला सतत भेटत राहायचे आहे, अशी मागणी करायचा. तसेच भेटले नाही तर तुझे माझ्याकडे असलेले फोटो व्हायरल करुन देईल, तसेच तुझ्या मुलाची हत्या
(Murder) करुन टाकेन, अशी धमकी
(Threatening to Married Woman) देत होता. अखेर या प्रेमवीराच्या मानसिक छळाला ही महिला कंटाळली होती. त्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलले. या महिलेने विष पिऊन आत्महत्या
(Married Woman Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. रविंद्र गोविंद आल्हाटे (रा. आल्हाटे) असे आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा - Mumbai: दोन लग्नांनंतर महिलेचा तिसऱ्यावर आला जीव, प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला काटा
महिलेने आरोपीला वारंवार समजावले
आरोपी हा 36 वर्षीय पीडित महिलेचा परिचयाचा आहे. तो 2 ऑक्टोबर 2021पासून विवाहितेला वारंवार छळत होता. तिला अश्लिल मेसेज पाठवत होता. तसेच तिला दररोज भेटण्याचा तगादाही लावत होता. या सर्व प्रकारला ही महिला कंटाळली होती. तिने आरोपी रविंद्रला वारंवार समजावण्याचा प्रयत्नही केला. मात्र, तरीसुद्धा तो ऐकत नव्हता. तिने समजवल्यानंतरही तो तिला त्रास देत होता. अखेर या विवाहित महिलेने या सर्व प्रकाराला कंटाळून दोन दिवसांपूर्वी विष पिऊन आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
तसेच पीडित विवाहितेच्या आईने म्हसरुळ पोलिसांत फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी रविंद्रवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.