मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नाशकात अंधश्रद्धेचा कळस! बायकोची भुताटकी घालवण्यासाठी पतीचं धक्कादायक कृत्य

नाशकात अंधश्रद्धेचा कळस! बायकोची भुताटकी घालवण्यासाठी पतीचं धक्कादायक कृत्य

नाशकात अंधश्रद्धेचा कळस! बायकोची भुताटकी घालवण्यासाठी पतीचं धक्कादायक कृत्य

नाशकात अंधश्रद्धेचा कळस! बायकोची भुताटकी घालवण्यासाठी पतीचं धक्कादायक कृत्य

बायकोचं आजारपण दूर करण्यासाठी नवऱ्याने चक्क गिधाडाचे अवयव घरात टांगल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे.

  • Published by:  Rahul Punde
नाशिक, 14 सप्टेंबर : आपल्याकडे कितीही कठोर कायदे असले तरी अद्याप समाजाच्या मानगुटीवरुन अंधश्रद्धेचं भुत काही उतरताना दिसतन नाही. असाच धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. बायकोचं आजारपण दूर करण्यासाठी नवऱ्याने चक्क गिधाडाचे अवयव घरात टांगल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका भोंदू बाबाच्या सल्ल्यानुसार गिधाडाची हत्या करून त्याचे अवयव घरात टांगण्यात आले होते. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे घटना? नाशिकमध्ये अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या एका व्यक्तीने मांत्रिकाच्या सांगण्यावरून धक्कादायक प्रकार केला आहे. तुझ्या बायकोला भुताटकीने झपाटले आहे. त्यामुळे त्यावर उपाय करावा लागेल. त्यासाठी गिधाडाची शिकार करून घरात ठेव असं मांत्रिकाने सांगितले होते. यावरुन आरोपी पतीने गिधाडांच्या शिकार करून घराच्या बाहेर पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाचा - हुंड्यावरून सतत वाद; पत्नीला कळू न देता पतीने तिची किडनी विकली, 4 वर्षानी खुलासा आठवडाभरापूर्वी बिबट्याच्या कातडीच्या तस्करी प्रकरणी काही संशयितांना वनविभागाने ताब्यात घेतले होते. त्यातील एका संशयिताच्या घरात हा प्रकार घडला आहे. बिबट्याची शिकार करुन त्याची कातडी काढून हळद, मीठ, तेल लावून घरात जतन करुन ठेवल्याचा प्रकार घडला होता. तस्करांच्या मुसक्या बांधल्यानंतर हा गुन्हा उघडकीस आला होता. 17 लाखात कातडीचा सौदा करण्यास निघालेल्या पालघर जिल्ह्यातील या तस्करांना इगतपुरीतील वनविभाग पथकाने ताब्यात घेतले होते. नामशेष होणाच्या मार्गावर असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा एका मृतभक्षी गिधाड पक्षाचे काही अवयव जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी वन्यजीव कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशिताविरुद्ध पुढील कारवाई सुरू आहे. तसेच जप्त केलेले अवयव व कातडी जमिनीत पुरलेले हाडे हे पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविण्यात येणार आहे.
First published:

Tags: Crime, Nashik

पुढील बातम्या