भुबनेश्वर 13 सप्टेंबर : पती-पत्नीच्या नातेसंबंधावर नेहमीच बोललं जातं. पत्नीवर जीवापाड प्रेम करणारे आणि प्रसंगी पैशांच्या हव्यासापोटी तिचा छळ करणारे असे दोन्ही प्रकारचे पती समाजात पाहायला मिळतात. परंतु ओडिशातील (Odisha) एका व्यक्तीनं पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारं कृत्य केलंय. पत्नीच्या सहमतीशिवाय तिची किडनी (Kidney) विकून त्यातून निर्दयी पतीने भरमसाठ पैसे कमावल्याचा प्रकार समोर आलाय. हुंड्याच्या कारणावरून पती-पत्नीत सतत वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे. ओडिशातील कोडामेटा या गावात रंजिता कुंडू नावाची महिला राहते. तिनं आपल्या पतीवरच किडनी विकल्याचा आरोप केला आहे. पतीनं आपल्याला न विचारताच किडनी काढून काळ्या बाजारात (Black Market) त्याची विक्री केल्याचं रंजिता यांचं म्हणणं आहे. आपल्याला एक किडनी नाही ही बाब त्या महिलेला 4 वर्षांनंतर माहिती झाली तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. शिक्षक पतीकडून पत्नीला बेदम मारहाण, मग अर्धनग्न करून घराबाहेर बसवत केलं धक्कादायक कृत्य मुतखड्याच्या नावावर काढून घेतली किडनी चार वर्षांपूर्वी रंजिता यांना मुतखड्याचा (Kidney Stone) त्रास होता. ऑपरेशनसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच काळात पतीनं किडनी काढून त्याची विक्री काळ्या बाजारात केल्याचा आरोप पतीवर लावण्यात आलाय. मुतखड्याचं ऑपरेशन करण्याच्या नावाखाली महिलेला बेशुद्ध (Anaesthesia) करण्यात आलं होतं. याचवेळी किडनी काढून त्याची विक्री केली गेली, असं या महिलेनं म्हटलंय. प्राप्त माहितीनुसार, किडनी काढून घेतलेल्या महिलेचा पती बांग्लादेश (Bangladesh Resident) येथील निर्वासित आहे. दोघांच्या लग्नाला 12 वर्षांपेक्षा अधिकचा काळ लोटला आहे. त्यांना दोन अपत्यही आहेत. मागील 8 महिन्यांपासून कुटुंबाला वाऱ्यावर सोडून पती पळून गेलाय. ती महिला मात्र तिच्या आई-वडिलांकडं राहते. हुंड्यासाठी जीवावर उठले सासरचे लोक; 19 वर्षीय विवाहितेला जिवंत जाळायला निघालेले इतक्यात… असं उघड झालं कारस्थान पत्नीची किडनी काढून घेतल्याची बाब तिला उशिरा कळाली. महिलेच्या पोटाच्या खालच्या बाजूला सतत दुखत होतं. काही केल्या हा त्रास कमी होत नव्हता. त्यामुळे ती महिला डॉक्टरांकडं गेली. तपासण्या केल्यानंतर रंजिता केवळ एकाच किडनीवर जीवन जगत असल्याचं समोर आलं. प्रसारमाध्यमांत आलेल्या बातम्यांनुसार, हुंड्याच्या (Dowry) कारणावरून दोघा पती-पत्नींत वाद सतत व्हायचा. याचदरम्यान पतीने किडनी विकण्याचा प्रकार केला. हा प्रकार उघड झाल्यानंतर त्रस्त झालेल्या महिलेनं पती आणि नणंदेविरोधात पोलिसांत तक्रार (Police Complain) दिली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची तपास करत आहेत. दरम्यान, हुंडा किंवा पैशांची मागणी करत भारतात असंख्य महिलांवर दरदिवशी शारीरिक व मानसिक अत्याचार (Physical And Mental Torture) होतात. अनेकवेळा महिला पोलिसांकडे जाऊन दादही मागतात. कारवाईही केली जाते. पण कौटुंबिक छळाचे हे प्रकार काही केल्या थांबत नाहीत. पत्नीला माहिती न होता केवळ पैशांसाठी तिची किडनी विकण्याचा ओडिशातील हा प्रकार तर धक्कादायक असा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.