नाशिक 6 सप्टेंबर : वाचन संस्कृतीला प्रेरणा मिळण्यासाठी नाशिक मधील सार्वजनिक वाचनालय सतत प्रयत्न करत असते. नेहमीच वेगवेगळे उपक्रम सार्वजनिक वाचनालय मार्फत राबवले जातात. वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय मंडळाने 250 पुस्तकांची भव्य गणपती बाप्पाची मूर्ती साकारली आहे. यामध्ये अध्यात्मिक, पौराणिक, सांस्कृतिक, आरोग्य, गोष्टी, आयुर्वेद या पुस्तकांचा संचय आहे. नाशिक मधील या सार्वजनिक वाचनालयाची स्थापना 1840 साली झाली. अधिकृत नोंदणी 10 एप्रिल 1953 साली झाली. वाचनालयाच्या स्थापनेपासूनच गणेशोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी वाचनालय सामाजिक संदेश आपल्या देखाव्याच्या माध्यमातून देत असतं. यावर्षी पुस्तकांचा बाप्पा साकारला आहे. यात 250 पुस्तक वापरण्यात आली आहेत. तसेच 25 किलो वर्तमानपत्र देखील वापरण्यात आली आहेत. हा अनोखा बाप्पा बघण्यासाठी दररोज शेकडो भाविक हजेरी लावत आहेत, अशी माहिती वाचनालयाचे प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके यांनी दिली आहे. हेही वाचा :
हसत-खेळत शिका निरोगी आरोग्याच्या टिप्स, औरंगाबादचे डॉक्टर करतायत जागृती VIDEO अशी सुचली कल्पना किशोर निकुंभ यांनी ही अनोखी मूर्ती साकारली आहे. किशोर हे गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक वाचनालयाशी जोडले गेले आहेत. त्यांना नेहमी वाटत की वाचन संस्कृती वाढली पाहिजे. तरुणांना प्रेरणा मिळाली पाहिजे. कारण वाचन हे आपल्या जीवनात खूप महत्वाचे असते. आपण विविध पुस्तक वाचली तर त्यातून आपला ज्ञानाचा साठा वाढतो. सद्या तरुण वर्ग हा सोशल मीडियाच्या आहारी गेला आहे. वाचन संस्कृती लोप न पावता ती वाढली पाहिजे याच अनुषंगाने त्यांनी हा देखावा साकारला आहे. हा देखावा बघून वेगवेगळी पुस्तक बघून तरुण वाचनालयाकडे आकर्षित होतील . हाच उद्देश त्यांचा आहे. त्यामुळे हा देखावा साकारला आहे. वैभवशाली नाशिकमध्ये सार्वजनिक वाचनालयाचा मोठा वाटा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक किंवा व्यवसाय क्षेत्रात ज्या नाशिककरांनी भरारी घेतली आहे. त्यांना घडविण्यात सार्वजनिक वाचनालयाचा मोठा हातभार लागला आहे. शेकडो लोक या वाचनालयाशी वर्षानुवर्षे जोडली गेली आहेत. त्यामुळे हे वाचनालय कायमच प्रेरणास्थान राहील आहे.
पुस्तकांचा बाप्पा बघण्याची वेळ पत्ता : सार्वजनिक वाचनालय 2Q3P+7GP, टिळक रोड, शालीमार, नाशिक, महाराष्ट्र 422001 वेळ : सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत आहे. या वेळेत तुम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.