जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / हसत-खेळत शिका निरोगी आरोग्याच्या टिप्स, औरंगाबादचे डॉक्टर करतायत जागृती VIDEO

हसत-खेळत शिका निरोगी आरोग्याच्या टिप्स, औरंगाबादचे डॉक्टर करतायत जागृती VIDEO

हसत-खेळत शिका निरोगी आरोग्याच्या टिप्स, औरंगाबादचे डॉक्टर करतायत जागृती VIDEO

डॉक्टर महादेव संकपाल लोककलेच्या माध्यमातून आरोग्यासंबंधी जनजागृती करण्याचं काम या गणेशोत्सवामध्ये करत आहेत.

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

    औरंगाबाद, 06 सप्टेंबर : कोरोना संसर्गजन्य आजारामुळे गेले दोन वर्ष गणेशोत्सव ( Ganeshotsav 2022) साध्या पद्धतीने साजरा करावा लागला. कोरोना काळामध्ये प्रत्येकाला आरोग्याचे व पर्यावरणाचे महत्त्व कळालं. कोरोनाची लाट ओसरली आणि यंदा निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे गणेश भक्तांच्या उत्साहाला उधाण आलं आहे. औरंगाबाद शहरातही यंदा गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. वेगवेगळे देखावे औरंगाबाद मधील मंडळांनी तयार केले आहेत. मात्र, यामध्ये सर्वांत जास्त लक्ष वेधून घेतले आहे ते डॉक्टर महादेव संकपाल यांनी कारण ते लोककलेच्या माध्यमातून आरोग्यासंबंधी जनजागृती करण्याचं काम या गणेशोत्सवामध्ये करत आहेत. चला तर मग आतापर्यंतचा त्यांचा प्रवास जाणून घेऊया. मूळचे फुलंब्री गावचे डॉक्टर महादेव संकपाल यांचे लहानपणीचे शिक्षण हे गावात झालं. शाळेत व विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये ते बालकलाकार म्हणून काम करू लागले आणि तेव्हापासून त्यांना कलेची आवड निर्माण झाली. जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण झालं त्यानंतर औरंगाबाद शहरांमध्ये मिलिंद महाविद्यालयात त्यांनी बारावी सायन्स मध्ये शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर मेडिकलसाठी प्रवेश घेऊन चार वर्षाचा वैद्यकीय सेवेचा कोर्स केला आणि 1980 साली ते बी एच एम एस डॉक्टर झाले.  ते सध्या वाळूज येथे आरोग्यसेवा देत आहेत. सध्या ते गणेशोत्सवामध्ये व्यसनमुक्ती, दुर्धर आजार, लसीकरण, स्वच्छता अभियान या संबंधी लोककलेच्या माध्यमातून जनजागृती करत आहेत. हेही वाचा :  Aurangabad : गणेशोत्सावानिमित्त कुस्त्यांची दंगल, राष्ट्रीय कुस्तीपटू सोनालीनं गाजवला आखाडा! VIDEO अशी केली आरोग्य जनजागृती करायला सुरुवात  डॉक्टर महादेव संकपाल हे लहानपणापासूनच लोककलेच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्यांच्या सहवासात राहत असल्यामुळे त्यांना कलेची आवड निर्माण झाली आणि त्यानंतर त्यांना आरोग्याची पदवी मिळाल्यानंतर आरोग्य जनजागृतीचे महत्त्व कळालं आणि तेव्हापासून त्यांनी आरोग्य जनजागृती करायला सुरुवात केली. नागरिकांना थेट आरोग्य बाबत सांगितल्यानंतर त्यांना त्याचे महत्त्व पटत नाही. मात्र, लोककलेच्या माध्यमातून त्यांना आरोग्याचे महत्त्व पटवून दिलं तर त्यांच्या लक्षात येतं हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते विविध ठिकाणी लोककला संगीत व मिमिक्रीच्या माध्यमातून जनजागृती करू लागले. आरोग्य जनजागृती करण्याचे ठरवल्यानंतर औरंगाबाद पासून सुरू झालेला हा जनजागृतीचा प्रवास फक्त जिल्हा पुरताच मर्यादित राहिला नाही तर तो राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये त्यासोबत इतर राज्यांमध्ये देखील त्यांनी स्वतःच जाऊन आरोग्याबाबत जनजागृती केली आहे. आरोग्य जनजागृती करत असताना ते कुठलाही पुरस्कार किंवा काही स्वीकारत नाहीत.आतापर्यंत 1990 कार्यक्रम त्यांनी केले आहेत. या कार्यक्रमांच्या विविध ग्रामपंचायतची संस्था संघटनांतर्फे देण्यात आलेले प्रमाणपत्रांची नोंदणी त्यांच्याकडे आहेत. हेही वाचा :  Aurangabad: तुमची मुलं काय करतात? रोज 10 टक्के विद्यार्थी शाळेत पोहचत नसल्याची माहिती उघड, VIDEO या प्रकारे करतात जनजागृती निरोगी आरोग्यचा एकच मंत्र खरा उपचारा पेक्षा प्रतिबंध बरा त्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करा कारण चुकीची जीवन शैली ही शरीरात अनेक आजार फैली   त्यासाठी खाऊ नका तंबाकू, बार, गुटखा तोंडच्या कॅन्सरने चावता येणार नाही भाकरीचा कूटका इलजा साठी कुठेही भटका भरलीच समजा तुमची जीवनाची घटका   गणेशोत्सवामध्ये मी आवर्जून जनजागृतीचे कार्यक्रम घेत असतो. गणेशोत्सवामध्ये प्रत्येक नागरिक एकत्र येत असतो आणि त्या एकत्र आलेल्या ठिकाणी त्यांची ऐकून घेण्याची मानसिकता असते. त्यामुळे गणेशोत्सव हा जनजागृती करण्याचा माझ्यासाठी महत्त्वाचा उत्सव असतो. त्यामुळे मी गणेशोत्सव व नवरात्र उत्सवामध्ये प्राधान्याने जनजागृतीसाठी अधिक वेळ देत असतो, असं डॉक्टर महादेव संकपाल सांगतात. आरोग्य जनजागृती करण्यासाठी विविध संस्था संघटना काम करत असतात मात्र त्यांना योग्य कलाकारांची माहिती नसते. यासाठी डॉक्टर महादेव संकपाल हे स्वतः मानधन तत्वावर जनजागृती करत असतात. कुठल्या कार्यक्रम संस्था संघटनांना घ्यायचे असेल तर त्यांच्यातर्फे मानधन तत्वावर ते आरोग्य जनजागृती महाराष्ट्रभर करतात. आरोग्या संदर्भात कुणाला जनजागृती करून घ्यायची असेलतर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. संपर्क क्रमांक 8446779706

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात