नाशिक 15 सप्टेंबर : नाशिक मधील पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावरील वाद काही नवीन नाही. नेहमीच हा टोलनाका वादाच्या भोवऱ्यात असतो. सतत चर्चेत असणाऱ्या या टोल नाक्यावर मारामारीचा प्रकार घडला आहे. टोल भरण्याच्या वादातून, प्रवासी आणि टोल कर्मचारी महिला यांच्यात तुंबळ हाणामारी झाली आहे. या मारामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार निफाड तालुक्यातील सीआरपीएफ जवान त्यांची पत्नी आणि दोन मुलांसोबत पुण्याला जात होते. त्यांनी बुधवारी संध्याकाळी पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर स्वत:चे शासकीय कार्ड दाखवून खासगी वाहन सोडण्याची विनंती केली. त्यावर टोलनाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांनी तुम्हाला टोल भरवाच लागेल, कार्ड चालणार नाही, असं सांगितलं, त्यानंतर सीआरपीएफ जवानाच्या पत्नीमध्ये आणि टोल कर्मचारी महीलेमध्ये बाचाबाची झाली,काही वेळातच त्याच रूपांतर थेट हाणामारीत झाले.
नाशिकमधील पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर दोन महिलांमध्ये टोल भरण्यावरुन वाद झाला. त्यानंतर दोघींमध्ये जोरदार मारामारी झाली. #Nashik #Toll #ViralVideo #नाशिक pic.twitter.com/qJOOg4paRL
— News18Lokmat (@News18lokmat) September 15, 2022
पिंपळगाव टोलनाका नेहमीच वादाच्या भोवऱ्यात..
पिंपळगाव टोलनाका नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी असतो. अनेक वेळा टोलनाक्यावरील कर्मचारी अरेरावीची भाषा वापरतात, दमदाटी करतात, असा आरोप वाहन चालकांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी तर थेट नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचीच गाडी टोल कर्मचाऱ्यांनी अडवली होती. त्या विषयावर सचिन पाटील आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला होता, तेव्हा ही सबंधित पिंपळगाव पोलीस ठाण्यात टोलनाका कर्मचार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील काळात ही अनेक वेळा अशी प्रकरण घडली आहेत.
नाशकात अंधश्रद्धेचा कळस! बायकोची भुताटकी घालवण्यासाठी पतीचं धक्कादायक कृत्य
वादावर पोलिसांनी टाकला पडदा..
टोल नाक्यावरील या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पिंपळगाव पोलीस दाखल झाले. त्यावेळी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी टोल कर्मचाऱ्यानं केली. यावर पोलिसांनी दोन्ही तक्रादारांच्या बाजू ऐकली आणि सबुरीचा सल्ला दिला. दोन्ही बाजूकडून पोलिसांनी यावेळी माफीनामे लिहून घेतले आणि या प्रकरणावर पडदा टाकला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nashik, Toll, Video viral