मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नाशिक पदवीधर निवडणुकीचा घोळ मिटेना! सत्यजित, शुभांगी पाटील की.. ठाकरे-काँग्रेसमध्येही दोन गट

नाशिक पदवीधर निवडणुकीचा घोळ मिटेना! सत्यजित, शुभांगी पाटील की.. ठाकरे-काँग्रेसमध्येही दोन गट

सत्यजित तांबे यांची अडचण वाढणार?

सत्यजित तांबे यांची अडचण वाढणार?

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील उमेदवारीवरुन महाविकास आघाडीत मोठा गोंधळ सुरू आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India
  • Published by:  Rahul Punde

नाशिक, 16 जानेवारी : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. ऐनवेळी आमदार सुधीर तांबे यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरल्याने महाविकास आघाडीत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. तांबेंच्या बंडखोरीवर काँग्रेसने नाराजी व्यक्त करत पाठींबा देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यावरून शिवसेना ठाकरे गटात दोन मतप्रवाह आहेत. तर बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांनाच काँग्रेसने पाठिंबा द्यावा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे.

शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यावरुन ठाकरे गटात दोन गट

अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याऐवजी सुभाष जंगले यांना पाठिंबा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केली आहे. सुभाष जंगले नगर जिल्ह्यातून येतात नगर जिल्ह्यात सर्वाधिक मतदार आहेत. एक लाख मतदारांची नोंदणी केल्याचं शुभांगी पाटील खोट बोलत आहेत. सुभाष जंगले यांना पाठिंबा देण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी बोललो आहे. जंगले यांनी देखील मला महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल म्हणून दावा केला आहे.

वाचा - MlC Election : सत्यजीत तांबे होणार निलंबित, काँग्रेस हायकमांडकडून आदेश

 सत्यजित तांबे यांनाच काँग्रेसने पाठिंबा द्यावा..

दुसरीकडे बंडखोर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनाच काँग्रेसने पाठिंबा द्यावा, अशी मागणी नाशिकमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव राहुल दिवे यांनी ही मागणी केली आहे. काही तांत्रिक कारणामुळे हा घोळ झाला आहे, त्यामुळे तांबे कुटुंबांच्या पाठीशी काँग्रेसने राहावे, अशी मागणी त्यांनी केलीय. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आम्ही सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्यासाठी मागणी करणार असल्याचेही दिवे यांनी सांगितले. दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणूक माघारीचा आज शेवटचा दिवस आहे. सत्यजित तांबे प्रचारात व्यस्त असून ते आपल्या संगमनेर शहरातच आहेत. संगमनेरातील निवासस्थानातून बाहेर पडले तरी प्रसार माध्यमांशी बोलण्यास मात्र नकार दिला आहे. कुठे जाणार, कुणाला भेटणार याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.

First published:

Tags: Nashik, Satyajit tambe