मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Nashik MLC Election: शुभांगी पाटलांना पराभवाचा धक्का; सत्यजित तांबे विजयी

Nashik MLC Election: शुभांगी पाटलांना पराभवाचा धक्का; सत्यजित तांबे विजयी

शुभांगी पाटील, सत्यजित तांबे

शुभांगी पाटील, सत्यजित तांबे

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. कोण बाजी मारणार याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर निवडणुकीचा निकाल हाती आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik [Nasik], India

नाशिक, 2 फेब्रुवारी :  नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक राज्यभरात गाजली. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारांमध्ये लढत होती. सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. तर भाजपने शेवटपर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र निवडणुकीपूर्वी दोन दिवस आधी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीचे समर्थन केल्यानं या निवडणुकीमध्ये चूरस निर्माण झाली होती. नाशिक पदवीधर मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर निवडणुकीचा निकाल हाती आला असून, सत्यजित तांबे यांनी शुभांगी पाटील यांचा पराभव केला आहे.

सत्यजीत तांबे यांना पाचव्या फेरीअखेर 68,999 मतं मिळाली, तर शुभांगी पाटील यांना 39,534 मतं घेता आली, त्यामुळे सत्यजीत तांबे यांचा 29,465 मतांनी दणदणीत विजय झाला आहे.

पहिल्या फेरीपासून आघाडीवर  

सत्यजित तांबे हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होते. तिसऱ्या फेरीअखेर सत्यजित तांबे यांचा विजय जवळपास निश्चित झाला होता. तिसऱ्या फेरीअखेर सत्यजित तांबे यांना एकूण 45 हजार 660 मतं मिळाली होती तर शुभांगी पाटील यांना एकूण 24 हजार 927  मतं मिळाली होती. तिसऱ्या फेरीत सत्यजित तांबे यांच्याकडे 20  हजार 733 मतांची आघाडी असल्यानं त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता.

हेही वाचा : Nagpur MLC Election : भाजपच्या बालेकिल्ल्याला मविआचा हादरा; नागपुरातून सुधाकर अडबोले विजयी

मित्राच्या निधनाचं दु:ख 

दरम्यान विजयाचा आनंद जरी असला तरी मित्राच्या निधनाचं दुख: आहे. त्यामुळे विजयोत्सव साजरा करणार नसल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांशी बोलताना सत्यजित तांबे यांनी दिली आहे. नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचं आज अपघाती  निधन झालं आहे. सत्यजित तांबे यांनी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे जाऊन मानस पगार यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.

First published:

Tags: MLC Election, Nashik, Satyajit tambe