मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik : बस दुर्घटनेतील मृतांसाठी सर्व धर्मगुरू एकत्र, घटनास्थळी केला खास विधी, Video

Nashik : बस दुर्घटनेतील मृतांसाठी सर्व धर्मगुरू एकत्र, घटनास्थळी केला खास विधी, Video

X
नाशिकमध्ये

नाशिकमध्ये 8 ऑक्टोबर रोजी पहाटे झालेल्या बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात बसला आग लागून 12 प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी अंत झाला होता.

नाशिकमध्ये 8 ऑक्टोबर रोजी पहाटे झालेल्या बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात बसला आग लागून 12 प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी अंत झाला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

नाशिक 22 ऑक्टोबर : नाशिकमध्ये 8 ऑक्टोबर रोजी पहाटे झालेल्या बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात बसला आग लागून 12 प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी अंत झाला होता. ही दुर्घटना घडली त्या  औरंगाबाद नाक्यावरील मिरची हॉटेल जवळ शनिवारी नाशिक जिल्ह्यातील सर्व साधू महंत पंडित,यांनी एकत्र आले होते.  दुर्घटनेत मृत झालेल्या आत्म्यांना शांती मिळावी, तसेच त्या जागेवर पुन्हा अशी दुर्घटना होऊ नये म्हणून 'उदक शांती " विधी करण्यात आला. महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी या उदक शांती विधीचे आयोजन केले होते.

यापूर्वीही झाला होता विधी

 2003 साली नाशिकमध्ये झालेल्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी होऊन काही जणांचा मृत्यू झाला होता,तेव्हा ही मृत आत्म्यांना शांती मिळावी म्हणून उदक शांती विधी केला होता.  सप्तशृंगी गडावर दरीमध्ये बस कोसळून काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता,तेव्हा देखील उदक शांती विधी करण्यात आला होता.  उत्तरखंड मध्ये झालेल्या महाप्रलयात देखील अनेक नागरिकांचा मृत्यू झाला होता, तेव्हा देखील मृतांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून उदक शांती विधी करण्यात आला होता.

उदक शांती हा विधी कात्यायन सूत्राच्या आधारीत नियमाद्वारे करण्यात आला आहे. यावेळी सर्व धर्माचे धर्म गुरू तसेच हिंदू,मुस्लिम,शीख, ख्रिश्चन, जैन,तसेच किन्नर समाजाचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये  विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली, तसंच मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली असे आयोजक महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी सांगितले.

अवघे 15 सेकंद आणि कारमधील साडेतीन लाख रूपये लंपास; नाशकातील अजब चोरीचा VIDEO

अंधश्रध्दा निर्मूलन समितीकडूनही स्वागत

सर्व समाजातील धर्म गुरूंनी एकत्रित येत ही विश्व शांती प्रार्थना केली, श्रद्धांजली वाहिली,ही स्वागतार्ह आहे. एखादा व्यक्ती कोणत्या समाजाचा आहे यापेक्षा तो माणूस म्हणून अधिक महत्त्वाचा आहे. ज्या कुटुंबातील व्यक्तींचा या दुर्घटनेत मृत्यू झाला त्यांच्या पाठीशी उभ राहून आधार देणं हे आपले कर्तव्यच आहे. तसेच सर्व जण एकत्रित आल्यामुळे एक चांगला संदेश यामधून देण्यात आला आहे. त्यामुळे आयोजकांचे अंधश्रध्दा निर्मूलन समिती आभारी आहे. या शब्दात महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्यवाहक महेंद्र दातरंगे यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.

दिवाळीच्या तोंडावर पुण्यात दुर्दैवी घटना, हॉटेलच्या आगीत 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

लक्झरी बसला दोन दरवाजे हवे

कोणतीही दुर्घटना कधी घडेल सांगता येत नाही.त्यामुळे अगोदरच काळजी घेणे गरजेचे असते,विशेष म्हणजे लक्झरी बसला पुढील बाजूस एकच दरवाजा असतो.जर काही घटना घडली तर प्रवाशांना दुसऱ्या बाजूने बाहेर पडण्यास मार्ग नसल्यामुळे जास्त जीवित हानी होण्याची शक्यता असते. या घटनेत देखील हाच प्रकार घडला.  मागील बाजूस दरवाजा असता तर प्रवासी बाहेर पडू शकले असते. त्यामुळे राज्य सरकारने लक्ष देऊन लक्झरी बसच्या सुरक्षेविषयी काळजी घेतली पाहिजे आणि दोन दरवाजे सक्तीचे केले पाहिजेत अशी मागणी महंत अनिकेत शास्त्री महाराज यांनी केली आहे.

First published:

Tags: Nashik, Private bus