मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik : खेळता खेळता बाळाने नेलकटर गिळलं, पुढे जे झालं ते थरारक

Nashik : खेळता खेळता बाळाने नेलकटर गिळलं, पुढे जे झालं ते थरारक

नाशिक (Nashik) शहरातील नाशिकरोड परिसरात आठ महिन्याच्या बाळाने चक्क नेलकटर गिळल्याची धक्कादायक घटना निदर्शनास आली आहे.

नाशिक (Nashik) शहरातील नाशिकरोड परिसरात आठ महिन्याच्या बाळाने चक्क नेलकटर गिळल्याची धक्कादायक घटना निदर्शनास आली आहे.

नाशिक (Nashik) शहरातील नाशिकरोड परिसरात आठ महिन्याच्या बाळाने चक्क नेलकटर गिळल्याची धक्कादायक घटना निदर्शनास आली आहे.

  • Published by:  Sandeep Shirguppe

नाशिक, 20 सप्टेंबर : तुम्ही लहान मुलांना शांत राहण्यासाठी नजरचुकीने खेळण्यासाठी कोणतीही वस्तू देता. ते बाळ शांत राहिल्यावर तुम्ही तुमच्या कामात लागता. (Nashik) पण त्या लहान बाळाला दिलेल्या वस्तुमुळे तुम्ही अडचणीत याल याची तुम्हाला कोणतीही माहिती नसते. दरम्यान नाशिकमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. नाशिक (Nashik) शहरातील नाशिकरोड परिसरात आठ महिन्याच्या बाळाने चक्क नेलकटर गिळल्याची धक्कादायक घटना निदर्शनास आली आहे. त्या बाळाच्या गळ्यातील नेलकटर काढण्यासाठी पालकांनी मोठी धावपळ केल्याने त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.

डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी नेलकटर बाहेर काढण्यात आल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आशिष शिंदे अस या बाळाचे नाव आहे. या 8 महिन्याच्या बाळाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी तत्परता दाखवल्याने बाळाचा जीव वाचला आहे.

हे ही वाचा : चंदीगड MMS लिक प्रकरणाचं मुंबई कनेक्शन? तपासात मोठी माहिती उघड

ही बाब लक्षात बाळाच्या आईच्या लक्षात आली आणि त्यानंतर या बाळावर शस्त्रक्रिया करून हे नीलकटर बाहेर काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान काही काळानंतर त्या बाळाची तब्बेत ठीक असल्याचे सांगण्यात आले आहे.

आठ महिन्याच्या मुलाने खेळता खेळता बेबी नेलकटर गिळल्याची घटना काल दुपारी नाशिकरोड परिसरात घडली होती. मुलाने नेलकटर गिळल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी त्याला आडगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करत नेलकटर बाहेर काढले. मुलाची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

हे ही वाचा : ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवामुळे राडा, पोलिसांवर केली दगडफेक, 3 जखमी

हा मुलगा घरामध्ये खेळत असताना त्याच्या हातामध्ये नेलकटर आले त्यानंतर बाळाने तोंडात घातले नंतर त्याला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचा आईने बघितले. बाळाच्या आईने तात्काळ नाशिकच्या आडगाव परिसरातील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी बाळावरती शस्त्रक्रिया करत नेलकटर बाहेर काढले. सध्या मुलाची प्रकृती असून त्याला कुठलीही पोहोचलेली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

First published:

Tags: Doctor contribution, Nashik, Surgery

पुढील बातम्या