लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 15 फेब्रुवारी : नाशिक **(Nashik)**मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आणि आरपीआयचे पदाधिकारी असलेल्या प्रशांत जाधव (RTI activist and RPI leader Prashant Jadhav) यांच्यावर गोळीबार झाला आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी प्रशांत जाधव यांच्यावर दोन राऊंड गोळ्या फायर केल्या. या हल्ल्यात प्रशांत जाधव हे जखमी (Prashant Jadhav injured) झाले आहेत. प्रशांत जाधव यांच्या मांडीला एक गोळी लागली आहे तर दुसरी गोळी त्यांच्या पोटाला चाटून गेली. (Firing on RPI activist Prashant Jadhav in Nashik) सिडको येथील उपेंद्र नगर भागात सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आरपीआयचे विधानसभा अध्यक्ष प्रशांत खंडेराव जाधव (वय 33, रा. उपेंद्रा नगर सिडको) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात जाधव जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. येत्या काही दिवसात महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातले आहे. सिडको भागात महापालिका निवडणुकीपूर्वीच गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. आरपीआयच्या विधानसभा अध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला असून यात त्यांच्या मांडीत गोळी शिरली असून ते या हल्ल्यात बचावले आहे. वाचा : ईडीची मोठी कारवाई, मुंबईत विविध ठिकाणी छापेमारी, राज्यातील एक ज्येष्ठ राजकीय नेताही रडारवर याबाबत पोलिसांनी सांगितले की, प्रशांत जाधव हे सोमवारी रात्री घरी जात असताना उपेंद्रनगर येथे यांच्या घराजवळच साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांच्यावर हा हल्ला झाला. एका दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने जाधव यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या, यापैकी एक गोळी जाधव यांच्या डाव्या पायाच्या मांडीत घुसली. गोळीबार केल्यानंतर हललेखोर यांनी पलायन केले. या गोळीबारात जाधव यांच्या डाव्या पायाच्या मांडी मध्ये गोळी घुसली. यानंतर त्यांना उपचारासाठी जवळच असलेल्या कल्पतरू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती ती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाचा : आईला शिवी दिल्याचा राग; जीवलग मित्राचा केला खेळ खल्लास, मुंबईला हादरवणारी घटना या घटनेची माहिती समजताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलीस उपायुक्त विजय खरात,सहायक पोलीस आयुक्त सोयल शेख व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात हल्लेखोरांचा पोलिस तपास करीत आहे आरपीआय महिला पदाधिकारी पूजा आंबेकरची हत्या ऐन दिवाळीत नाशिकमध्ये भीषण हत्याकांड घडलं होतं. आरपीआयच्या महिला पदाधिकारीची हत्या केल्याची घटना समोर आली होती. मृतक महिलेचं नाव पूजा आंबेकर असं असल्याची माहिती समोर आली होती. पूजा आंबेकर ही आरपीआयची महिला पदाधिकारी होती. दिवाळीत रात्रीच्या सुमारास पूजाची हत्या करण्यात आली होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पूजा आंबेकर या आरपीआयच्या पदाधिकारी होत्या. रात्रीच्या सुमारास संत कबीर नगरमध्ये राहत्या घरात त्यांची हत्या करण्यात आली. ही हत्या इतक्या निर्घृणपणे करण्यात आली की, आरोपीने पूजा आंबेकर यांच्यावर चाकूने तब्बल 20 ते 25 वार केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.