मुंबई, 15 फेब्रुवारी: आईला शिवी दिल्याच्या कारणातून एका तरुणाने आपल्या शालेय वर्गमित्राची निर्घृण हत्या (School friend's murder) केली आहे. रात्री पार्टी केल्यानंतर दारुच्या नशेत असणाऱ्या मित्रानं आरोपीच्या आईला शिवी (abused to mother) दिली. या कारणातून पारा चढलेल्या आरोपीनं भररस्त्यात आपल्या मित्राला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आहे. एका स्थानिक नागरिकाने हा प्रकार पाहिल्यानंतर त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रविवारी पोलिसांनी आरोपीला अटक (accused arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
राहुल गायकवाड असं हत्या झालेल्या 21 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तर सुशांत घोटकर (22) या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राहुल आणि आरोपी सुशांत हे एकमेकांचे शालेय मित्र आहेत. राहुल हा बेरोजगार असून सुशांत हाऊसकिपींगचं काम करतो. घटनेच्या दिवशी 11 फेब्रुवारी रोजी सुशांतचा पगार झाला होता. त्यामुळे त्याने आपला जीवलग मित्र राहूल यास पार्टीसाठी बोलावलं होतं. रात्री दोघांनी एकत्र बसून मद्यपान केलं होतं.
हेही वाचा-आई जीव देत होती अन् लेकरं पाहात राहिली; मुलांना काठावर ठेवून महिलेची विहिरीत उडी
दोघांनी अंधेरी परिसरात तीन ठिकाणी बसून त्यांनी मद्यपान केलं होतं. यानंतर मद्यधुंद अवस्थेत दोघंही मरोळ-मरोशी रस्त्यावर फिरत होते. दरम्यान दोघांमध्ये वाद झाला. यावेळी मृत राहुलनं सुशांतच्या आईला शिवीगाळ केली. यामुळे चिडलेल्या सुशांतने थेट राहुलला रस्त्यावरील पेव्हर ब्लॉकनं मारहाण (beat with fever block) केली. यातील एक जबरी घाव राहुलच्या डोक्यात लागला. यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. हे पाहून सुशांत घाबरला आणि त्यानं घटनास्थळावरून पळ काढला.
हेही वाचा-रिकामटेकड्या तरुणांचं विकृत कृत्य; अल्पवयीन मुलांना सेक्स करण्यास पाडलं भाग अन्
यावेळी संबंधित परिसरातून जाणाऱ्या एका व्यक्तीला रस्त्यावर कोणीतरी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसलं. धक्कादायक प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीनं घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होतं जखमी राहुलला कूपर रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी उपचार सुरू असताना घटनेच्या दुसऱ्या दिवशी (12 फेब्रुवारी) राहुलने अखेरचा श्वास घेतला आहे. यानंतर पोलिसांनी मोबाइलच्या माध्यमातून मृताची ओळख पटवली. तसेच घटनेच्या दिवशी संशयित आरोपी सुशांत त्याच्यासोबत असल्याचं पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोधून काढलं. या माहितीच्या अधारे पोलिसांनी रविवारी सुशांतला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.