मुंबई, 20 फेब्रुवारी: आरोग्य विभाग, नाशिक इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती वैद्यकीय अधिकारी एकूण जागा - 07 पुण्यातील या विद्यापीठात नोकरीची मोठी संधी; ग्रॅज्युएट असाल तर घ्या अर्जाची Link
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वैद्यकीय अधिकारी - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बी. ए. एम. एस. (B.A.M.S.) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार वैद्यकीय अधिकारी - 45,000/- रुपये प्रतिमहिना (दुर्गम भागातील अधिकाऱ्यांसाठी), 40,000/- रुपये प्रतिमहिना (इतर भागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी) IAS-IPS, NDA की ISRO नक्की कोणत्या सरकारी नोकरीत मिळते मोठी सॅलरी?
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय नाशिक कार्यालय Wardha News: बेरोजगार हातांना मिळणार ‘हवं ते काम’, 8 लाखांहून जास्त तरुणांचा फायदा! अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 28 फेब्रुवारी 2023
JOB TITLE | Arogya Vibhag Nashik Vacancy 2023 |
---|---|
या जागांसाठी भरती | वैद्यकीय अधिकारी एकूण जागा - 07 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | वैद्यकीय अधिकारी - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बी. ए. एम. एस. (B.A.M.S.) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | वैद्यकीय अधिकारी - 45,000/- रुपये प्रतिमहिना (दुर्गम भागातील अधिकाऱ्यांसाठी), 40,000/- रुपये प्रतिमहिना (इतर भागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी) |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय नाशिक कार्यालय |
माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://zpnashik.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.