जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / IAS-IPS, NDA की ISRO नक्की कोणत्या सरकारी नोकरीत मिळते मोठी सॅलरी? आकडा बघून व्हाल थक्क

IAS-IPS, NDA की ISRO नक्की कोणत्या सरकारी नोकरीत मिळते मोठी सॅलरी? आकडा बघून व्हाल थक्क

आकडा बघून व्हाल थक्क

आकडा बघून व्हाल थक्क

भारतात विविध प्रकारच्या सरकारी नोकऱ्या आहेत. सरकारी नोकऱ्यांच्या यादीत प्रशासकीय किंवा नागरी सेवा सर्वात वरच्या स्थानावर आहेत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 फेब्रुवारी: भारतात सरकारी नोकरी मिळवू इच्छिणाऱ्यांची खूप क्रेझ आहे. दहावी उत्तीर्ण झाल्यावरच लोक नोकरीची तयारी करू लागतात. पण प्रत्येकाला चांगल्या पगाराची सरकारी नोकरी हवी असते. यासाठी लोकांना खूप प्रयत्न करावे लागतात. तरच तुम्हाला चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळू शकते. भारतात विविध प्रकारच्या सरकारी नोकऱ्या आहेत. सरकारी नोकऱ्यांच्या यादीत प्रशासकीय किंवा नागरी सेवा सर्वात वरच्या स्थानावर आहेत. संरक्षण सेवा, ISRO किंवा DRDO वैज्ञानिक, RBI ग्रेड नोकऱ्या आणि विविध PSU नोकऱ्या यासारख्या इतर अनेक सरकारी नोकऱ्या आहेत. या परीक्षा प्रचंड स्पर्धात्मक असतात आणि त्यासाठी लक्ष केंद्रित तयारी आवश्यक असते. मात्र यामध्ये पगार खूप जास्त मिळतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही सरकारी नोकऱ्या सांगणार आहोत ज्यामध्ये सर्वाधिक पगार मिळतो. Maharashtra Police Bharti: नक्की कधी होणार 1 लाख 84 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा? मोठी अपडेट आली समोर IAS आणि IPS देशाच्या व्यवस्थापनासाठी आणि प्रगतीसाठी आयएएस आणि आयपीएस महत्त्वाचे आहेत. एक IPS SP म्हणून पोस्ट केला जातो, आणि IAS कलेक्टर कम DM (जिल्हा दंडाधिकारी) (पोलीस अधीक्षक) म्हणून पोस्ट केला जातो. शिवाय, ते दोघेही योग्य प्रशासन देण्यासाठी परिपूर्ण सामंजस्याने काम करतात. IAS आणि IPS साठी 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत वेतन खालीलप्रमाणे आहे. IAS (भारतीय प्रशासकीय सेवा) - रु 56,100 ते रु 2,25,000 IPS (भारतीय पोलीस सेवा) – रु 56,100 ते रु. 2,25,000 जागा तब्बल 11,000 आणि पात्रता फक्त 10वी पास; सरकारी नोकरीसाठी आजची शेवटची तारीख; करा अप्लाय एनडीए आणि संरक्षण सेवा भारतीय सैन्य हे भारतीय प्रजासत्ताकाचे सैन्य दल आहे. हे भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल या तीन गणवेशधारी सेवा प्रदान करते. संरक्षण सेवांमध्ये विविध नोकऱ्या मिळविण्यासाठी उमेदवाराला एनडीए, सीडीएस, एएफसीएटी इत्यादी विविध परीक्षांमध्ये पात्र होणे आवश्यक आहे. भारतीय लष्कर आव्हानात्मक काम करते पण त्यांना उत्कृष्ट पदोन्नती सुविधा मिळतात. एवढेच नाही तर त्यांना चांगला पगारही मिळतो. भारतीय सैन्यातील विविध पदांसाठी वेतन श्रेणी खाली दिली आहे: एनडीए आणि संरक्षण सेवांमध्ये पगार - रु 56,100 ते रु. 2,50,000/- ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी लाखो रुपये पगाराचा गोल्डन चान्स; TCS करणार मोठी पदभरती इस्रो, डीआरडीओ शास्त्रज्ञ/अभियंता संशोधन आणि विकासामध्ये स्वारस्य असलेले अभियांत्रिकी उमेदवार ISRO आणि DRDO मध्ये शास्त्रज्ञ आणि अभियंता या पदांसाठी अर्ज करू शकतात. या संस्थांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला राहण्याची चांगली सोय होते. तसेच या संस्थांमध्ये काम केल्याने समाजात तुम्हाला अपार मान-सन्मान मिळतो. ISRO आणि DRDO मधील वैज्ञानिक पदासाठी वेतन रचना खाली दिली आहे: वैज्ञानिक - रु. 56,100 ते रु. 2,25,000

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात