नाशिक 12 डिसेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वे स्थानकावर चहा विकल्याचं सांगितलं जातं. चहा विकून त्यांनी पंतप्रधान पदापर्यंत मजल मारली. नाशिकच्या नरेंद्र धात्रकने ही त्याच प्रकारे चहा विकून मोठा कीर्तिमान केला आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण होऊन नरेंद्र इन्कम टॅक्स ऑफिसर झाला आहे. …आणि सुरु केला चहाचा छोटासा गाडा नरेंद्र मुळचा नाशिक शहरापासून साधारण दहा ते बारा किलोमीटर वर असलेल्या रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेल्या आशेवाडी या गावचा आहे. नरेंद्रच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे. वडील मोलमजुरी करून घर चालवतात. नरेंद्रने पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण मराठा हायस्कूल मध्ये पूर्ण केलं. परंतु शिक्षण घेत असताना त्याला घरची परिस्थिती आठवली की शिक्षण नको वाटायचं. कारण पुढील शिक्षणासाठी इतके पैसे आणायचे कुठून? मग आपण काही तरी काम करू पैसे कमवू ज्यातून घराला ही हातभार लागेल आणि शिक्षणाचे बघू असे नरेंद्रने ठरवले.
MPSC Exam : कोल्हापुरातल्या हमालाच्या पोरीने करून दाखवलं…. राज्यात आली पहिली!
त्यानंतर त्याने नाशिक जिल्हा परिषद समोर चहाचा छोटासा गाडा सुरू केला. त्यातून थोडे पैसे मिळत त्यातच नरेंद्र आपला सर्व खर्च भागवत होता. या काळात त्याच्याकडे जिल्हा परिषद मधील अधिकारी चहा घेण्यासाठी यायचे आणि त्याच्या ही मनात कुठं तरी वाटायचं की आपण ही असं अधिकारी झालं पाहिजे. मग त्याने हळूहळू पुढील शिक्षण सुरू केलं. मुक्त विद्यापीठातच बारावी पर्यंतचे शिक्षण घेऊन पुढे पॉलिटेक्निक डिप्लोमा केला. नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला असं नरेंद्रने सांगितलं. दररोज 8 ते 10 तास केला अभ्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळवने हे नरेंद्रसाठी सोपे नव्हते. दररोज पहाटे 4 वाजता उठायचं स्वतःच आवरायचं आणि चहाचे दुकानं लावायचे. दुपार पर्यंत तिथं काम करायचं. त्याच्यानंतर दुपारी घरी जाऊन अभ्यास करायचा पुन्हा सायंकाळी दुकाणावर यायचं काही वेळ दुकान चालवायचं. पुन्हा सायंकाळी 8 वाजता दुकान बंद करून घरी जायचं. जेवण करून अभ्यासाला बसायचं रात्री 1 वाजे पर्यंत अभ्यास करायचा असा दिनक्रम नरेंद्रचा ठरवलेला होता. असं करत करत त्याने अभ्यास केला. पहिल्या प्रयत्नात अपयश आल मात्र खचून न जाता अभ्यास सुरूच ठेवला आणि अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाची परीक्षा उत्तीर्ण होऊन इन्कम टॅक्स ऑफिसर झाला आहे.
STI Exam Result : बीडचा शुभम राज्यात पहिला, पाहा 4 वर्षांच्या परिश्रामानंतर कसं मिळलं यश? Video
चहा विकला,कठोर मेहनत घेतली माझ्या ही आयुष्यात अनेक संकटे आले पण मी डगमगलो नाही. ठरवल होत काही तरी करून दाखवायचं. मी जर माझ्या घरच्या परिस्थितीचा बाऊ केला असता तर आज मी हे यश प्राप्त करू शकलो नसतो. मी परिस्थितीवर मात केली. चहा विकला,कठोर मेहनत घेतली. आई वडिलांचे कष्ट मला मेहनत करण्यास बळ देत होते. त्यामुळे ठरवा तुम्हाला काय करायचं आहे. नक्की यश मिळेल अशी प्रतिक्रिया नरेंद्र धात्रक यांनी दिली आहे. वडिलांना अश्रू अनावर अतिशय काबाड कष्ट करून उभा केलेला संसार आणि आता मुलाचं हे यश बघून काय बोलावं सुचत नाही आहे. त्याने खूप मेहनती मधून हे यश प्राप्त केलं आहे. चहाचा गाडा चालवून त्याने करून दाखवलं याचा आम्हाला अभिमान आहे आणि अजून पुढे तो चांगल काही तरी करेल अशी भावनिक प्रतिक्रिया वडील रघुनाथ धात्रक यांनी दिली आहे.