मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik: पाय गेला पण जिद्द वाढली, आंतरराष्ट्रीय पदकं जिंकणाऱ्या खेळाडूची प्रेरणादायी गोष्ट Video

Nashik: पाय गेला पण जिद्द वाढली, आंतरराष्ट्रीय पदकं जिंकणाऱ्या खेळाडूची प्रेरणादायी गोष्ट Video

अपंगत्वावर मात करत स्वत:ची वेगळी ओळख नाशिकच्या मयूर देवरे ( Mayur Devare ) या शरीरसौष्ठवपटूने निमार्ण केली आहे.

नाशिक, 14 सप्टेंबर : एखादी गोष्ट साध्य करण्याची आपल्यात जिद्द आणि चिकाटी असेल ना तर त्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. परिस्थिती देखील आपल्यासमोर नतमस्तक होते. हेच सिद्ध करून दाखवले आहे नाशिक ( Nashik ) येथील मयूर देवरे ( Mayur Devare ) या शरीरसौष्ठवपटूने. अपंगत्वावर मात करत मयुरने पॉवर लिफ्टिंग ( Powerlifting ) आणि शरीरसौष्ठव (Bodybuilding) स्पर्धेत अनेक सुवर्ण पदके मिळवली आहेत. एका पायाला आलेल्या अपंगत्वाने खचून न जाता त्याने ही कामगिरी केली आहे. चला तर मग या स्पेशल रिपोर्टमध्ये त्याच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया. मयुरचा प्रवास हा अतिशय थरारक आहे. आपण विचार देखील करू शकत नाही की एखादा व्यक्ती असं यश कसं मिळवू शकतो. मयुर सात आठ महिन्यांचा असताना त्याला पोलिओची बाधा झाली आणि त्याचा डावा पाय निकामी झाला. म्हणजे त्या डाव्या पायाचा आपल्या जीवनात उपयोगच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. आई वडिलांनी डॉक्टरांना दाखवल तेव्हा डॉक्टर बोलले यावर एकच उपाय आहे तो म्हणजे व्यायाम. व्यायाम जर केला तर काही अंशी पायात बळ येईल आणि तिथूनच खरा प्रवास मयुरचा सुरू झाला. हेही वाचा : Nashik : अंध असूनही इतरांना करतात मदत, आजवरचा प्रवास वाचून वाटेल अभिमान मयुर खचला नाही एक पाय गेला म्हणून आयुष्य संपल नाही आणि याच विश्वासावर मयुरचा पुढील प्रवास सुरू झाला. महानगरपालिकेच्या व्यायाम शाळेत व्यायामास सुरुवात केली. तिथं अनेक मित्र भेटले मित्रांनी आधार दिला प्रोत्साहन दिले आणि हळूहळू मयुर व्यायामात रमला. दहावीत असताना व्यंकटराव हिरे महाविद्यालयात भरलेल्या 'कर्मवीर श्री ' या शरीरसौष्ठव स्पर्धेत मयुरने प्रथमच यश संपादन केले आणि तिथून मिळालेल्या आत्मविश्वासावर मयुरने अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पदकांना गवसणी घातली. माझ अपंगत्वच खऱ्या अर्थाने माझ्या यशाचं कारण ठरलं देवाने मला अपंगत्व दिलं म्हणून आज मी इथपर्यंत पोहचू शकलो आहे. अन्यथा मी इतकं यश मिळवू शकलो नसतो. त्यामुळे प्रथमतः देवाचे आभार, असं शरीरसौष्ठवपटू देवरे सांगतो. देशभरात उमटवला ठसा पॉवर लिफ्टींग स्पर्धेत मिळवलेल यश 2008 मध्ये झालेल्या नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत 56 किलो वजनी गटात 110 किलो वजन उचलून प्रथम सुवर्णपदक पटकावले. 2009 मध्ये गोंदिया, नागपूर तर 2010 मध्ये कोल्हापूर इथे झालेल्या राज्यस्तरीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदके पटकावली. त्यांनतर 2019 मध्येच नागपूर इथे पॅरा ऑलम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. नागपूर येथे सिनियर गटात सुवर्ण पदक पटकावले. यवतमाळ, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आदी ठिकाणी झालेल्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत त्याने सुवर्णपदकांची लयलूट केली. 2015 मध्ये दिल्ली इथे झालेल्या स्पर्धेतही चौथा क्रमांक पटकावला. अशा प्रकारे मयूरने विविध स्पर्धांमध्ये 20 सुवर्ण, दोन सिल्व्हर, दोन ब्राँझ मेडल पटकावली आहेत. हेही वाचा :  मुलाचा आवाज कानात घुमला आणि आईला मिळाली प्रेरणा, नाशिकच्या अश्विनी बनल्या Ironwomen, Video शरीरसौष्ठव स्पर्धेत मिळवलेल यश मिस्टर युनिव्हर्स मध्ये चौथा क्रमांक पटकावला आहे. मिस्टर इंडियामध्ये कांस्यपदक पटकावले आहे. महाराष्ट्र श्री स्पर्धेत रौप्यपदक मिळवलं आहे. 2018 चा'नाशिक श्री' जिल्हा क्रीडा पुरस्कारचा ही बहुमान मिळाला आहे. पॅरालिम्पिक पॉवर लिफ्टींगमध्ये 16 स्टेट चॅम्पियन,  5 टाईम नॅशनल, 2 टाईम स्ट्राँग मॅन ऑफ महाराष्ट्र होण्याचा बहुमान मयुरने मिळवला आहे. आज एक आंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर म्हणून मयुरची ओळख निर्माण झाली आहे. मयुरच्या आयुष्यात यांचा मोलाचा वाटा मयुरला त्याच्या या यशात आई वडिलांनी तर साथ दिलीच मात्र त्याच्या या यशस्वी कारकिर्दीत मार्गदर्शक म्हणून अश्विन पांचाळ, राजेंद्र सातपूरकर, मिलिंद वसाईकर , संग्राम राठोड यांनी देखील मोलाची साथ दिली आहे. मयूरने अनेकाना बॉडीबिल्डिंग पॉवर लिफ्टींग क्षेत्रात घडवलं  मयूरकडे बघून अनेक तरुण प्रोत्साहित होतात. त्यांना वाटत की ज्याला पाय नाही. तो व्यक्ती इतकं यश मिळवू शकतो तर आपण का नाही. त्यामुळे अनेक तरुण आज ही मयूरचे मार्गदर्शन घेतात. मयूरने स्वामी हेल्थ क्लब व्यायाम शाळेची स्थापना केली आहे. आज ही अनेक तरुणांना तिथं मार्गदर्शन केलं जातं. अनेकांनी यश ही मिळवलं आहे.
First published:

Tags: Nashik, Sports

पुढील बातम्या