जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / 2 लाखाच्या कर्जाची एवढी मोठी परतफेड! 40 वर्षीय व्यक्तीचं11 वर्षाच्या मुलीसोबत लग्न, आता म्हणतो..

2 लाखाच्या कर्जाची एवढी मोठी परतफेड! 40 वर्षीय व्यक्तीचं11 वर्षाच्या मुलीसोबत लग्न, आता म्हणतो..

सांकेतिक छायाचित्र

सांकेतिक छायाचित्र

लक्ष्मीपूर पोलीस ठाणे हद्दीत राहणारा 40 वर्षीय महेंद्र पांडे याने मुलीच्या आईला 2 लाख रुपयांचे कर्ज दिले होते. महेंद्र हा मुलीच्या आईकडे पैसे परत मागत होता.

  • -MIN READ Patna,Bihar
  • Last Updated :

पाटणा 30 एप्रिल : एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जाची परतफेड न केल्याने एका 40 वर्षीय व्यक्तीने एका 11 वर्षीय मुलीसोबत लग्न केल्याचं सांगितलं जात आहे. महेंद्र पांडे असं लग्न केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. ही घटना बिहारच्या सिवान जिल्ह्यातून समोर आली आहे. महेंद्र हा मैरवा पोलीस ठाणे हद्दीतील लक्ष्मीपूर गावचा रहिवासी आहे.

News18लोकमत
News18लोकमत

मैरवा पोलीस ठाणे हद्दीतील छेनी छपर गावात चर्चा आहे की, लक्ष्मीपूर पोलीस ठाणे हद्दीत राहणारा 40 वर्षीय महेंद्र पांडे याने मुलीच्या आईला 2 लाख रुपयांचे कर्ज दिले होते. महेंद्र हा मुलीच्या आईकडे पैसे परत मागत होता. मुलीचे आई-वडील गरीब आहेत, त्यांना काही कारणास्तव कर्जाची परतफेड करता आली नाही. यामुळे कर्ज देणारा महेंद्र पांडे याने त्यांच्या 11 वर्षाच्या मुलीसोबत लग्न केलं आणि आता त्याने मुलीला आपल्या घरी ठेवलं आहे. पीडित मुलीच्या आईने सांगितलं की, ‘मैरवा पोलीस स्टेशन हद्दीतील लक्ष्मीपूर गावात नातेवाईक आहेत, तिथे मुलगी नेहमी जात-येत असे. त्याच गावातील महेंद्र पांडे यांनी मला सांगितलं की, मी तुझ्या मुलीला माझ्या घरी ठेवून तिला शिक्षण देईल. यानंतर महेंद्रने तिच्याशी लग्न करून तिला आपल्यासोबत ठेवलं. माझी मुलगी माझ्याकडे परत यावी, अशी माझी इच्छा आहे.’ आरोपी महेंद्र पांडे याचं वय 40 वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याने आधी 11 वर्षाच्या मुलीशी लग्न केलं. त्यानंतर तो वेगवेगळ्या गोष्टी सांगतो. कधी तो म्हणतो की, माझ्याकडून चूक झाली आहे, मला जी शिक्षा होईल ती मी भोगेन. तर कधी तो म्हणतो, की मी तिला माझी मुलगी म्हणून घरी आणलं आहे. तिला जिथे जायचं असेल तिथे ती जाऊन राहू शकते. तर, कधी तो मुलीच्या आईला धमकी देतो की, ही बातमी पसरवली तर तुला अडकवू. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात विविध चर्चा रंगत आहेत. महेंद्र पांडे विवाहित असून त्याला दोन मुलंही आहेत, असं सांगितलं जात आहे. त्याने पसंतीने लग्न केल्याचं त्याच्या पत्नीचं म्हणणं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात