औरंगाबाद, 04 ऑक्टोबर : स्वतःची इच्छा असतानाही सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे अनेक महिलांना शिक्षण घेऊन नोकरी करण शक्य होत नाही. मात्र, नोकरी करण्याची संधी मिळाली तर त्या काय करू शकतात, याची प्रचिती औरंगाबादमध्ये आली आहे. शामला काळे यांना पतीने नोकरीची संधी दिली. आज त्या चार कंपन्यांच्या मालकीण असून त्यामध्ये शेकडो कर्मचारी काम करत आहेत. औरंगाबाद शहरातील वाळूज भागातील शामला अशोक काळे असे यशस्वी उद्योजिकेच नाव आहे. त्या मूळच्या बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील आहेत. साधारण कुटुंबातील शामला यांच्या वडीलांचे किराणा दुकान तर आई गृहिणी होत्या. त्यांना एक भाऊ एक बहीण असा त्यांचा परिवार होता. शामला घरामध्ये सर्वात मोठे होत्या. त्यावेळी आर्थिक आणि सामाजिक स्थिती शिक्षणाबद्दल प्रतिकूल होती. 12 वी नंतर शामला यांचा वैद्यकीय महाविद्यालयात नंबर लागला. त्यावेळी मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवण्याबाबत बरेच गैरसमज होते. त्यामुळे शामला यांना वैद्यकीय शिक्षण घेता आलं नाही. लग्नानंतर सोडला नोकरीचा विचार शामला यांनी घरातील वडीलधाऱ्यांची समजूत घातली आणि बीएससी इलेक्ट्रोनिकमध्ये पदवीपर्यंतच शिक्षण घेतले. शिक्षणानंतर शामला यांचे औरंगाबाद शहरातील इंजिनियर अशोक काळे यांच्याशी लग्न झालं. शिक्षण घेऊन नोकरी करायचं शामला यांच स्वप्न होतं मात्र, लग्न झाल्याने त्यांनी नोकरीला विचार सोडला होता. मेकॅनिकल इंजिनिअर अशोक काळे हे मूळचे अंबाजोगाईतील आडस या गावचे. मात्र, शिक्षणासाठी त्यांचे कुटुंब औरंगाबाद शहरात स्थायिक झाले. शामला यांचे लग्न झाल्यानंतर अशोक काळे हे एका कंपनीमध्ये नोकरीला होते. दरम्यान लग्नानंतर त्यांनी स्वतःच स्टार्टअप करण्याचं निर्णय घेतला. स्वतःचा Clad metal india pvt. Ltd. हा व्यवसाय सुरू केला हळूहळू व्यवसाय वाढत गेला. पतीच्या पाठबळाने सुरू केली नोकरी व्यवसाय वाढल्याने अशोक यांच्यावर कामाचा भार वाढला. शामला यांचे शिक्षण झालेले होते त्यामुळे घरच्या लोकांनी शामला यांना अशोकच्या व्यवसायात मदत करण्यास सांगितले. 1998 साली त्यांनी पतीच्या कंपनीमध्ये एक कर्मचारी म्हणून नोकरी जॉईन केली. त्यावेळी कंपनीचा टर्न ओव्हर 50 लाख आणि 70 कर्मचारी कामाला होते. त्यांचे शिक्षण बीएससी मध्ये आणि कंपनी मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे शिक्षणाचा आणि कामाचा ताळमेळ लागत नव्हता. मात्र, नोकरी करण्याची जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शामला यांनी कर्मचाऱ्यांसोबत बसून स्वतः सर्व बारकावे समजून घेतले. आज कंपनीचे सर्व काम शामला यांच्या देखरेखीमध्ये होते. Success Story : नोकरी सोडून शेतकऱ्यांसाठी उभारली ‘टिश्यू कल्चर लॅब’, पाहा, VIDEO 500 कोटींचा टर्न ओव्हर शामला यांच्या कंपनीमध्ये फ्रीजचे सर्व पार्ट बनतात. फ्रीजमध्ये असलेला आईस बॉक्स देखील येथे तयार होता. शामला यांच्याकडे आता 500 कर्मचारी असून कंपनीचा टर्न ओव्हर 500 करोड रुपयांपर्यंत पोहोचला आहे. भविष्यात हा टर्न ओव्हर 100 करोड होईल, असा विश्वास शामला काळे यांचा आहे. संधीचे सोने करून यशस्वी होता येतं महिलांच्या अनेक स्वप्न असतात. त्यांच्यामध्ये ती पूर्ण करण्याची इच्छाशक्ती देखील असते. मात्र, अनेक वेळा परिस्थितीमुळे त्यांना करणे शक्य होत नाही. मात्र आपल्याकडे अनेक संधी येत असतात. त्या संधीचे सोने करून घेतलं तर आपण नक्की यशस्वी होऊ शकतो. महिलांनी अपयशाला खचून न जाता मिळेल त्या संधीचा सोनं करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असे शामला सांगतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोडली नोकरी, प्राध्यापिका बनली यशस्वी उद्योजिका महिलांना प्रोत्साहनाची गरज गृहिणींमध्ये घर चालवण्यासोबतच शिक्षणानुसार कौशल्य असतात. मात्र, कुटुंबातील व्यक्तींनी जर त्या कौशल्याला प्रोत्साहन दिलं तर महिला देखील पुरुषांप्रमाणे समाजामध्ये स्वतःचा अस्तित्व निर्माण करू शकतात. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीने महिलांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे अशोक काळे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.