मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /हुसेन दलवाई त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर, समोर सुरक्षारक्षक, पुढे काय घडलं? Video

हुसेन दलवाई त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर, समोर सुरक्षारक्षक, पुढे काय घडलं? Video

हुसेन दलवाई त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर

हुसेन दलवाई त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर

Trimbakeshwar temple case news : काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर जाऊन दर्शन घेतलं. मागच्या काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या इतर धर्मियांच्या प्रवेशावरून वाद सुरू आहे.

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

त्र्यंबकेश्वर, 18 मे : काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर जाऊन दर्शन घेतलं. मागच्या काही दिवसांपासून त्र्यंबकेश्वर मंदिरातल्या इतर धर्मियांच्या प्रवेशावरून वाद सुरू आहे. हुसेन दलवाई त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर जाताच तिथल्या सुरक्षारक्षकांनी प्रवेशद्वाराजवळ बॅरिकेट्स लावली.

हुसेन दलवाई यांनी मंदिराच्या बाहेरून दर्शन घेतलं, तसंच पायरीजवळ जाऊन हात जोडले आणि मोबाईलमध्ये मंदिराचे फोटोही घेतले. मी मंदिरात जाणार नाही, म्हणत हुसेन दलवाई यांनी सुरक्षारक्षकांना सुनावलं. सुरक्षारक्षक हुसेन दलवाई यांना अडवायला सुरूवात करत होते, पण त्यांनी प्रवेशद्वारातूनच दर्शन घेतलं आणि ते माघारी फिरले.

प्रवेशद्वारातूनच माघारी फिरल्यानंतर हुसेन दलवाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुस्लिम समाजाने शांत राहावं, असं आवाहन हुसेन दलवाई यांनी केलं. 'त्र्यंबकेश्वरमधल्या लोकांचं स्वागत करायला आलो, इतकं सगळं होऊनही लोकं शांत राहिली. जिथे परवानगी असते तिथेच दर्शनाला जातो, इथे धार्मिक सलोखा आहे, काही लोक ते बिघडवण्याचं काम करत आहेत. काही संघटना येऊन इथे काय करतायत? त्यांच्यावर कारवाई करा. इथे येऊन मनुस्मृती लादायची आहे का? आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, महात्मा गांधी होण्याची गरज आहे,' असं हुसेन दलवाई म्हणाले.

काय झाला वाद?

त्र्यंबकेश्वर मंदिरात हिंदू धर्मीयांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नाही, तरीही 13 मे रोजी इतर धर्मींच्या जमावाने मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवलं होतं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलिसांनी सदर मिरवणूक थांबवून चौकशी केली. तसंच देवस्थान ट्रस्टने लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.

आता या प्रकरणी पोलिस काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. विना परवानगी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. बुधवारी मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदू संघटनांकडून शुद्धीकरण करण्यात आले. तर ग्रामसभेत हिंदू-मुस्लिम बांधवांनी उपस्थित राहून एकोप्याचं दर्शन घडवलं.

त्र्यंबकेश्वर प्रवेशद्वारावर शुद्धीकरण, ग्रामसभेत एकोप्याचं दर्शन; उरुस आयोजक म्हणाले, हे सगळं भीतीदायक

एसआयटी स्थापन करावी - फडणवीस

त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात एक विशिष्ट जमाव जमला होता. त्यांच्याकडून कथितरित्या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे. या घटनेची आता गृहमंत्रालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआटी स्थापन करावी असं फडणवीसांनी म्हटलं आहे. ही एसआयटी गेल्या वर्षीच्या प्रकरणाची देखील चौकशी करणार आहे.

...तरच तुळजाभवानीचं दर्शन घेता येणार, मंदिर प्रवेशासाठी नवी अट!

First published:
top videos

    Tags: Nashik, Trimbkeshwar Temple