मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik : हार्ट अटॅक आला तर घाबरू नका, ‘या’ पद्धतीनं वाचवा रूग्णाचा जीव, VIDEO

Nashik : हार्ट अटॅक आला तर घाबरू नका, ‘या’ पद्धतीनं वाचवा रूग्णाचा जीव, VIDEO

आपल्या आजूबाजूला एखाद्या व्यक्तीला हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि ती व्यक्ती खाली कोसळली तर आपण प्रथमतः कशी मदत केली पाहिजे जाणून घ्या.

नाशिक, 19 सप्टेंबर : हृदयाचे विकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अनेक नागरिकांना याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बऱ्याच वेळा हृदयाचा तीव्र झटका येऊन हृदयक्रिया जागीच बंद होऊन बरेचसे व्यक्ती आपल्या आजूबाजूला मृत्युमुखी पडताना दिसतात. मात्र, जर आपल्या आजूबाजूला एखाद्या व्यक्तीला हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि ती व्यक्ती खाली कोसळली तर आपण प्रथमतः कशी मदत केली पाहिजे. आपण कोणत्या पद्धतीने त्या व्यक्तीवर प्रथमतः काय उपचार करू शकतो. याबाबतची सविस्तर माहिती या रिपोर्ट मधून जाणून घेऊया. व्यक्तीच्या मदतीला धावून जा  सर्वात प्रथम आपल्या आजूबाजूला एखादी व्यक्ती हृदय विकाराचा तीव्र झटका येऊन पडली तर त्या व्यक्तीच्या मदतीला धावून जा. त्यानंतर त्या व्यक्तीला आवाज देऊन बघा किंवा थोडंसं हाताने त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न करा. जर ती व्यक्ती तुम्हाला काहीच प्रतिसाद देत नसेल तर खरंच हृदय क्रिया बंद पडली आहे का ? याची शहानिशा करा. लगेच तात्काळ आपल्या आजूबाजूला जे कोणी लोक असतील त्यांना मदतीला बोलवा. जवळ असणाऱ्या हॉस्पिटलला फोन करा किंवा महाराष्ट्र सरकारच्या 108 क्रमांकाच्या ॲम्बुलन्सशी संपर्क साधा. हेही वाचा : Oral heath : दात स्वच्छ करण्यासाठी Toothpick वापरताय? आताच बदला ही सवय, होतात हे दुष्परिणाम हृदयावर दाब देण्याची प्रक्रिया सुरू करा हॉस्पिटलची संपर्क साधत असतानाच त्या व्यक्तीच्या हृदयावर दाब देण्याची प्रक्रिया आपण सुरू केली पाहिजे. साधारण हृदयावर दोन स्तनांच्या मध्ये स्टरनम जो पार्ट असतो. त्याच्यावर दोन्ही हात फोल्ड करून साधारण एका मिनिटाला 100 ते 120 प्रकारचे दाब दीले पाहिजे. दोन मिनिट सतत छाती दाबत राहा. प्रत्येक वेळी छाती दोन इंच दाबली गेली पाहिजे आणि दाबली गेलेली छाती वर आल्यावरच नंतर दाब द्या. दोन मिनिट सतत ही प्रक्रिया केल्यानंतर श्वास तपासा,आपला कान रुग्णाच्या नाकासमोर न्या आणि नजर छातीवर ठेवा. रुग्णाच्या कंठाच्या बाजूला असलेली नस पुन्हा तपासून नाडीचे ठोके तपासा, ठोके लागत नसल्यास हीच प्रक्रिया पुन्हा चालू ठेवा तोपर्यंत ॲम्बुलन्स येईल आणि रुग्णाला हॉस्पिटल मध्ये हलवता येईल. ॲम्बुलन्समध्ये ही प्रक्रिया सुरूच ठेवा  यामुळे डॉक्टरांची मदत मिळेपर्यंत आपण कृत्रिमरित्या हृदय चालू ठेवून मेंदूला रक्तपुरवठा चालू ठेऊ शकतो. अशा प्रकारे त्या व्यक्तीचे प्राण आपण वाचवू शकतो असं  हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत देवरे सांगतात. हेही वाचा : Cancer and Age: लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही होऊ शकतो कॅन्सर; या लोकांना जास्त धोका व्यायाम हृदय विकारापासून ठेऊ शकतो दूर  आपल शरीर सदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला दररोज व्यायाम करण्याची खूप आवश्यकता आहे. व्यायाम आपले सर्व आजार दूर ठेऊ शकतो. मात्र, त्यात सातत्य असल पाहिजे. दररोज एक तास तरी व्यायाम करणे गरजेचे आहे. हृदय विकाराच्या घटना वाढण्यामागचे कारण हे ही आहे की आपली लाईफ स्टाईल बदलली आहे. खाणे पिणे बदलले आहे. जेवणाचा क्रम व्यवस्थित नसणे. तसेच डायबिटीस सारखा आजार आणि त्यात व्यायामाचा अभाव असल्यामुळे त्रास अधिक वाढत आहे. व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला हृदय विकार फार कमी प्रमाणात होतो किंवा झालाच तर तो व्यक्ती वाचू शकतो. भूलतज्ज्ञ संघटना मोफत वर्कशॉपचे करते आयोजन भारतीय भूलतज्ञ संघटना गेल्या अनेक वर्षांपासून यावर काम करत आहे. प्रत्येक नागरिक जीव रक्षक बनला पाहिजे यासाठी विविध ठिकाणी मोफत वर्कशॉपचे आयोजन करत असते. त्यामध्ये सर्व प्रकारची माहिती दिली जाते की आपण दुसऱ्या व्यक्तीच्या जीव कसा वाचवू शकतो. त्यामुळे आपल्या विभागात,परिसरात जर अशा वर्कशॉपचे आयोजन करायचे असेल तर 91 98223 91355 / 9850645018 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
First published:

Tags: Health Tips, Nashik

पुढील बातम्या