मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Nashik : नाशिक जिल्ह्यात घ्या केदारनाथचा अनुभव, अंजनेरी पर्वतरांगेत साकारलंय हुबेहुब मंदिर, पाहा VIDEO

Nashik : नाशिक जिल्ह्यात घ्या केदारनाथचा अनुभव, अंजनेरी पर्वतरांगेत साकारलंय हुबेहुब मंदिर, पाहा VIDEO

X
नाशिक

नाशिक जिल्ह्यात अंजनेरी पर्वतरांगेत उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. हे मंदिर पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

नाशिक जिल्ह्यात अंजनेरी पर्वतरांगेत उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. हे मंदिर पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

नाशिक 22 ऑगस्ट : वाढोली (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे शिवशक्ती ज्ञानपीठाच्या आश्रमात श्री स्वरुपेश्वर बाणेश्वर महादेव मंदिर हे पुणे (Pune) येथील श्रुतीसागर आश्रमाच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे. अंजनेरी पर्वतरांगेत हे मंदिर असून प्रतिकेदारनाथ ( pratikedarnath temple ) म्हणून अलीकडे हे मंदिर प्रचलित झाले आहे. सध्या भाविकांचे हे मंदिर मुख्य आकर्षण ठरत आहे. उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराची हुबेहूब प्रतिकृती हे मंदिर आहे.

या मंदिराचे कामकाज 2014 साली पूर्ण झाले आणि तेव्हा पासूनच मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते.  मात्र, तेव्हा मंदिराचा फार प्रचार प्रसार झाला नव्हता अनेकांना मंदिर माहित नव्हत. पण 2022 च्या सुरुवातीलाच मंदिराचे काही फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रतिकेदारनाथ मंदिर नावाने प्रचंड व्हायरल झाले. तेव्हापासून परिसरात प्रथमच असे मंदिर असल्याने शेकडो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.

हेही वाचा : 500 वर्षांचा इतिहास असलेलं राजराजेश्वर मंदिर, कावड यात्रेचीही मोठी परंपरा! VIDEO

मंदिरापर्यंत कसे पोहोचाल 

मंदिरात जाण्यासाठी नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाताना वाढोली फाटा आहे. त्या फाट्यावरून डाव्या हाताला टर्न घेतल्यानंतर 3 किलोमीटर अंतरावर वाढोली गावं आहे. गावातून पुढे मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. गावापासून साधारण 3 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे. तसेच अंजनेरी फाट्यावरून देखील मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. नाशिक शहर ते प्रतिकेदारनाथ मंदिर हे अंतर साधारण 30 किलोमीटर आहे. खाजगी वाहनाने किंवा बसने तुम्ही जाऊ शकता.

दर्शनाची वेळ

मंदिरात दर्शनाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर दर्शन बंद केलं जातं कारण मंदिर परिसरात पूर्णतः जंगल आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर लवकर बंद केले जाते.

भक्त निवासाची व्यवस्था

अंजनेरी पर्वत रांगेत चार एकरच्या जागेत हे मंदिर साकारण्यात आले आहे. मंदिर परिसरात भक्त निवास, भागवत पूज्यपाद, शंकराचार्य आश्रम, दुर्गा परमेश्वरी मंदिर आहे. सामान्य नागरिकांमध्ये आध्यात्मविद्येचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी हे मंदिर स्थापन करण्यात आले आहे.

 हेही वाचा : Pune: क्रांतीकारकांच्या वाड्याचा जीर्णोद्धार, 139 वर्षांपूर्वीचा इतिहास पुन्हा जिंवत, VIDEO

प्रतिकेदारनाथची निर्मिती

उत्तराखंड मधील केदारनाथला दर्शनाला जाण्यासाठी सर्वच भाविकांना शक्य होत नाही. शेकडो मैल केदारनाथ मंदिर दूर आहे. त्यामुळे भाविकांना येथेच दर्शन मिळावं. या उद्देशाने मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. श्री स्वरूपेश्वर बाणेश्वर महादेव मंदिराचा प्रतिकेदारनाथ मंदिर म्हणून प्रचार प्रसार हा भाविकांनीच केला आहे. दररोज शेकडो भाविक मंदिरात दर्शनासाठी येत असतात. निसर्गरम्य वातावरण बघून त्यांना केदारनाथला आल्याचा भास होतो. सर्व भाविकांना येथे प्रसन्न वाटत, अशी प्रतिक्रिया व्यवस्थापक पुजारी पंढरीनाथ महाराज यांनी दिली आहे.

निसर्गरम्य वातावरणात प्रतिकेदारनाथ

मंदिरात दर्शन घेतल आणि खूपच समाधान मिळालं. जणू मी उत्तराखंड मधील केदारनाथ मंदिरातच दर्शन घेते असा भास मला झाला. केदारनाथ मंदिराची हुबेहुब प्रतिकृती निर्माण केली आहे. पर्वतरांगेच्या कुशीत वसलेलं हे प्रतिकेदारनाथ मंदिर सर्वच भाविकांचे आकर्षण ठरले आहे. सर्वच भाविकांना केदारनाथला जायला जमणार नाही. मात्र त्यांनी येथे येऊन जरी दर्शन घेतल तरी समाधान मिळेल.अशी प्रतिक्रिया दर्शनासाठी आलेल्या प्रियंका बोडके यांनी दिली आहे.

First published:

Tags: Nashik, Temple