नाशिक, 19 एप्रिल : जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. विहीर खोदताना झालेल्या जिलेटीनच्या भीषण स्फोटात तीन मजुरांचा जागीचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या हरसूलमधील हिरडी गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. लहू, महाजन, विभीषण जगताप, आबा बोराडे अशी मृत मजुरांची नावं आहेत. हे सर्व मजूर बीड जिल्ह्यातल्या आष्टीचे रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या हरसूलमधील हिरडी गावात ग्रामपंचायतची विहीर खोदताना हा अपघात झाला. जिलेटीनच्या भीषण स्फोटात तीन मजुरांना आपला जीव गमवावा लागला आहे. लहू, महाजन, विभीषण जगताप, आबा बोराडे अशी मृत मजुरांची नावं आहेत. हे सर्व मजूर बीड जिल्ह्यातल्या आष्टीचे रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.