मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...म्हणे घर बसल्या Degree देतो, नाशिकमध्ये एकाची 1 लाख 25 हजारांत फसवणूक

...म्हणे घर बसल्या Degree देतो, नाशिकमध्ये एकाची 1 लाख 25 हजारांत फसवणूक

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

नाशिकमध्ये एका 28 वर्षीय तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे. महाविद्यालयात न जाता पदवी देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • Published by:  News18 Desk
नाशिक, 19 ऑगस्ट : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात आता नाशिकमध्ये आता आर्थिक फसवणुकीशी संबंधित धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यात एकाची तब्बल 1 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. महाविद्यालयात न जाता पदवी देण्याच्या आमिषाने ही फसवणूक करण्यात आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - नाशिकमध्ये एका 28 वर्षीय तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे. महाविद्यालयात न जाता पदवी देण्याच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाकीर अब्दुल रहेमान शाह असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याची तब्बल 1 साथ 25 रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकारे पैसे उकळले - जाकीर अब्दुल रहेमान शाह हा येवला तालुक्यातील आहे. त्याच्याशी नांदगाव येथील जाकीर रफिक कुरेशी, ठाण्यातील गुफरान खान मोहंमद आली आणि बंगळुरू येथील पाशा मुर्शल आली, मनोज तिवारी यांनी संपर्क साधला होता. यातील तिघे हे संशयिताचे मित्र आहे. सुरुवातीला त्यांनी फिर्यादी जाकीर अब्दुल रहेमान शाह याचा विश्वास संपादन केला तसेच त्याला शिक्षणासाठी बाहेर कुठेच जाण्याची गरज नाही. घरी बसून तुला पदवी मिळवून देऊ, असे आश्वासन दिले. हेही वाचा - पुण्यात 42 कोटींची फसवणूक; बिटकॉइन गुंतवणुकीबाबत धक्कादायक माहिती आली समोर  तसेच त्याला बंगुळूरू येथील एका विद्यापीठाशी संपर्क करण्यात आल्याचेही भासविण्यात आले आणि याप्रकारे त्याच्याकडून तब्बल 1 लाख 25 हजार रुपये उकळले. यानुसार त्याच्याकडून शैक्षणिक कागदपत्रेही मागवली. मात्र, त्याला पदवी मिळाली नाही तसेच पैसेही परत मिळाले नाही. यामुळे त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला धक्काच बसला. त्यामुळे त्याने थेट येवला तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच याप्रकरणी तक्रार दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
First published:

Tags: Crime news, Money fraud, Nashik

पुढील बातम्या