विठ्ठल भाडमुखे, प्रतिनिधी नाशिक 4 एप्रिल : नाशिक हे एक नाही तर अनेक गोष्टींसाठी फेमस आहे. वाईन कांदा चिवडा,द्राक्षे यांनी नाशिकची नवी ओळख निर्माण केली आहे. जगाच्या नकाशावर या गोष्टींसाठी नाशिक ओळखल जातं. वाईन कॅपिटल बरोबरच बिअर कॅपिटल म्हणून देखील नाशिकची नवी ओळख निर्माण होणार आहे. अभिषेक पाटील आणि जय पाटील या दोन मित्रांनी एकत्रित येत नाशिक जिल्ह्यात बिअर निर्मितीचा कारखाना उभारला आहे. आठ प्रकारच्या युरोपियन बिअरची निर्मिती नाशिक शहरालगत असलेल्या विल्होळी परिसरात तोपची नावाने हा बिअर निर्मितीचा प्रकल्प उभारला गेला आहे. संशोधन आणि विकास या तत्वावर सध्या या बियरची निर्मिती आणि वितरण होत आहे. विविध प्रकारच्या धाण्यांपासून जवळपास आठ प्रकारच्या युरोपियन बिअर तयार केल्या जात आहेत. सध्या बेल्जियम विट,क्रीम अले,एम्बर एल या बिअरला सर्वाधिक मागणी आहे.अनेक नाशिककर तसेच बाहेरील बिअर शौकीन तोपचीला भेट देऊन चव चाखत आहेत. त्यांना सरकारनं अजून पॅकेजिंगसाठी अजून परवानगी दिलेली नाही. मात्र पार्सल किंवा तिथे जाऊन आपण बिअर घेऊ शकतो.
‘आम्ही जवळपास सहा ते सात वर्षांपासून हा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न करत होतो. मात्र अनेक अडचणी येत होत्या. पण, बियर निर्मिती कारखाना काढण्यावर आम्ही ठाम होतो. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही वाईन क्षेत्रात काम करतो. त्यामुळे आम्हाला स्वत:ला काहीतरी करायचं होतं. आमचे हे प्रयत्न अखेर यशस्वी झाले आहेत. आमच्याकडे सध्या युरोपियन बिअर आहेत. मात्र पुढील काळात ग्राहकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन सुद्धा बिअर आणि वाईन तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत,’ अशी प्रतिक्रिया बियर निर्माते जय पाटील यांनी दिली. शालेय विद्यार्थ्यांचं जबरदस्त संशोधन, अंधांसाठी बनवली Blind Stick, पाहा Video नाशिकमध्येच का? ‘आम्ही नाशिकच्या हवामानाचा अभ्यास केल्यानंचक हा निर्णय घेतला आहे. वाईन, बिअर निर्मितीसाठी नाशिकच हवामान पोषक आहे. इथं द्राक्षं,तसेच विविध प्रकारचे धान्य आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारे उत्पादन करू शकतो. ज्या धाण्यांपासून आपण बियर निर्मिती करतो ते प्रक्रिया मशीन आमच्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे विदेशातून ते आयात करावं लागतं. पुढील काळात ती प्रक्रिया देखील इथच करण्याचा आमचा प्रयत्न असेल. व्हिस्की थंड पाण्यात पिऊ नका; असं का म्हणतात एक्सपर्ट? काळा,लाल भात,नागली,गहू, जव अशा विविध धाण्यांपासून बियर निर्मिती केली जाते. आम्ही तयार केलेल्या बिअर मध्ये 5 टक्के अल्कोहोल असते,कोणत्याही प्रकारचे फ्रिझरवेटीव्ह यात टाकले जात नाही,’ अशी प्रतिक्रिया अभिषेक पाटील यांनी दिली आहे.