नाशिक, 02 जानेवारी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिक मधील ड्रीम प्रोजेक्ट असलेलं बोटॅनिकल गार्डन सद्या धूळखात पडलं आहे. नाशिक महापालिकेत सत्ता असताना राज ठाकरे यांनी लाखो रुपये खर्च करून या बोटॅनिकल गार्डनची शहरालगत पांडवलेणीच्या पायथ्याशी निर्मिती केली होती. उद्योजक रतन टाटा यांनी देखील राज ठाकरे यांच्या या महत्वकांक्षी प्रकल्पात मदत केली होती. उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन सोहळा पार पडला होता. या बोटॅनिकल गार्डन मध्ये लेझर शोच्या माध्यमातून पर्यावरण वाचवण्यासाठी अनोखा संदेश देण्यात आला होता. मात्र, काही दिवसातच महानगरपालिका आणि वन विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे बोटॅनिकल गार्डनची पुरती दुरवस्था झाली असल्याचा आरोप मनसे कडून करण्यात आला आहे. बोटॅनिकल गार्डनचे मुख्य आकर्षण होते लेझर शो या पर्यावरण पूरक संकल्पनेचे सर्वांनीच स्वागत केले होते. गार्डनमध्ये अतिशय सुंदर प्रकारे लेझर शो सुरू करण्यात आला होता. पर्यावरण वाचवण्यासाठी हा मोलाचा संदेश होता. झाड स्वतः बोलायची आम्हाला तोडू नका वाचवा. आमच्यामुळे तुम्हाला पुरेसा ऑक्सिजन मिळेल जर आम्ही वाचलो नाही तर तुम्ही देखील वाचणार नाहीत. त्यामुळे आम्हाला त्रास होईल आमचा रास होईल असं काही करू नका असे विविध संदेश पर लेझर शो होता. अगदी लहानांपासुन तर मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच पसंतीस हा शो उतरला होता. परंतु काही दिवसातच शो बंद पडला.
जाणूनबुजून विरोधकांनी दुरवस्था केली मनसेच्या सत्ता काळात नाशिक शहरात जे प्रोजेक्ट उभारले गेले त्याची दयनीय अवस्था झाली आहे. मनसेने सत्ता काळात नाशिककरांचा विचार करून वेगवेगळ्या प्रोजेक्टची निर्मिती केली होती. बोटॅनिकल गार्डन सर्वांचं आकर्षण होतं परंतु ते ही डबघाईला आले आहे आणि याला जबाबदार सत्ताधारी राजकारणी आहेत. मनसेची सत्ता जाताच दूरवस्था झाली अन्यथा गार्डन सुस्थितीत होतं. मात्र, आता जर तात्काळ गार्डनची देखभाल केली नाही लेझर शो सुरू केला नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहराध्यक्ष संदेश जगताप यांनी दिला आहे. राजकीय वादात नाशिककरांचा बळी तुमच्या राजकीय वादात आमचा बळी देऊ नका. अनेक चांगल्या प्रकल्पांची नाशिकमध्ये नासधूस झाली आहे. हा प्रोजेक्ट राज ठाकरे यांनी निसर्गरम्य वातावरणात उभारला होता. काही दिवस व्यवस्थित चालू होता अनेक नागरिक या ठिकाणी पर्यटन करायचे मात्र काही दिवसातच बिकट अवस्था झाली, लेझर शो देखील बंद झाला. त्यामुळे राजकारण न करता व्यवस्थित देखभाल करावी हीच आमची अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया नागरिक सिद्धेश सानप यांनी दिली आहे.
Video : नाशिककरांसाठी 2023 ठरणार का लकी? रोजगार, पाऊस, पीकपाण्याबद्दल ज्योतिषांनी वर्तवलं भविष्य
दुरुस्तीचे काम चालू आहे यासंदर्भात आम्ही वनविभागाशी संपर्क साधला असता दुरुस्तीचे काम चालू आहे म्हणून सांगण्यात आले. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून महानगरपालिका आणि वनविभाग हीच कारण देत असल्यामुळे नागरिकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.